Headlines

अरबाज खानने मलायका अरोराला केले अनफॉलो, कारण…

[ad_1]

Arbaaz Khan Unfollows Malaika Arora : बॉलिवूड अभिनेता आणि सलमान खान याचा भाऊ अरबाज खान काही दिवसांपूर्वी दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकला. त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले. अरबाज खानने प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट शुरा खानबरोबर लग्नगाठ बांधत नवीन आयुष्याची सुरुवात केली. त्यानंतर आता अरबाज खानने त्याची पहिली पत्नी आणि अभिनेत्री मलायका अरोराला अनफॉलो केल्याची माहिती समोर आली आहे. 

अरबाज खान आणि मलायका अरोराचा 6 वर्षांपूर्वी घटस्फोट झाला. त्यानंतर त्या दोघांचेही नाव वेगवेगळ्या व्यक्तींशी जोडले गेले. अखेर अरबाज खानने 24 डिसेंबर 2023 रोजी दुसऱ्यांदा निकाह केला. अरबाजने वयाच्या 56 व्या वर्षी मेकअप आर्टिस्ट शुरा खानबरोबर लग्नगाठ बांधली. अरबाज आणि शुराच्या लग्नाला खान कुटुंबियांसह सिनेसृष्टीतील अनेक कलाकार मंडळीही उपस्थित होती. त्यांच्या लग्नाचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले.  

शूरा खानबरोबर निकाह केल्यानंतर अरबाज हा सोशल मीडियावर सक्रीय झाल्याचे दिसत आहे. त्याने त्याच्या दुसऱ्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले आहेत. पण यादरम्यान अरबाजने त्याची पहिली पत्नी मलायकाला अनफॉलो केल्याची माहिती समोर आली आहे. अरबाज खानच्या इन्स्टाग्राम फॉलोवर्स यादीत मलायका अरोराचे नाव कुठेही पाहायला मिळत नाही. सध्या अरबाज खान हा इन्स्टाग्रामवर 127 जणांना फॉलो करतो. यात सलमान खान, सोहेल खान, मुलगा अरहान खान, फराह खान, करिश्मा कपूर यांच्या नावाचा समावेश आहे. 

तर दुसरीकडे मलायका अरोराही अजूनही अरबाज खानला फॉलो करत आहे. मलायकाच्या इन्स्टाग्राम फॉलोवर्सच्या यादीत प्रियांका चोप्रा, आलिया भट्ट, दीपिका पादुकोण, शाहिद कपूर हे कलाकारही पाहायला मिळत आहे.


 
दरम्यान अरबाज खान आणि मलायका अरोरा यांनी 1998 मध्ये लग्न केलं होतं. लग्नापूर्वी काही वर्ष ते एकमेकांना डेट करत होते. लग्नाच्या 19 वर्षांनंतर मलायका आणि अरबाज यांचा अधिकृत घटस्फोट झाला. त्या दोघांनाही एक मुलगा असून त्याचं नाव अरहान खान असं आहे. अरबाज खानबरोबर घटस्फोट घेतल्यानंतर सध्या मलायका ही अर्जुन कपूरला डेट करत आहे. ते दोघेही लवकरच लग्न करणार असल्याचे बोललं जात आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *