Headlines

रिक्षा ड्रायव्हर, फेरीवाल्यांसाठी महामंडळ तयार करणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा | Eknath Shinde announced new economic development corporation for rickshaw drivers hawkers

[ad_1]

राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस सत्ताशकट हाकत आहेत. सत्तांतर झाल्यापासून शिंदे-भाजपा यांच्या संयुक्त सरकारने अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. दरम्यान यांनी राज्यातील रिक्षाचालक तसेच फेरीवाल्यांसाठी नव्या आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली जाईल, अशी घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली आहे. ते मालेगावमध्ये एका सभेला संबोधित करत होते.

हेही वाचा >> “२७ सेकंदांमध्ये ७० शिव्या देणारे कोणाला दिसत नाहीत, पण राज्यपालांच्या…”, कोश्यारींच्या वक्तव्यावर चित्रा वाघ यांचे विधान

“शिवसेना-भाजपा युतीचे सरकार राज्याला न्याय देईल. राज्याला पुढे घेऊन जाईल. गोरगरीब जनतेच्या मुलांच्या जीवनात बदल झाला पाहिजे. त्यांची मुलं शिकली पाहिजेत. त्यांच्या परिवाराला वैद्यकीय मदत मिळाली पाहिजे, यासाठी एक आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, असे मला दादा भुसे यांनी सांगितले आहे. रिक्षावाला, ड्रायव्हर किंवा फेरीवाले असतील, या सर्वांसाठी एक आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात येणार आहे,” असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

हेही वाचा >> ज्यपालांच्या विधानाने महाराष्ट्राचा काय अपमान झाला? त्यांचे समर्थन करतो- प्रकाश आंबेडकर

“हा एकनाथ शिंदे तुमच्यातीलच एक आहे. मला गरिबीची जाण आहे. त्यामुळे महामंडळ स्थापन करण्याचे काम युद्धपातळीवर केले जाईल. सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम हे महामंडळ करेल. माजी मंत्री दादा भुसे आणि माजी मंत्री उदय सामंत यांना त्याची जबाबदारी दिलेली आहे,” अशी माहितीही एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

हेही वाचा >> “हे पार्सल परत पाठवायला हवं”; वादग्रस्त व्यक्तव्यानंतर उद्धव ठाकरेंची राज्यपाल कोश्यारींवर सडकून टीका

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या राज्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान ते राज्यभरातील शिवसैनिक तसेच जनतेशी संवाद साधत आहेत. सध्या शिंदे गट आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील संघर्ष निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन पोहोचला आहे. याच कारणामुळे पदाधिकाऱ्यांच्या समर्थनासाठी एकनाथ शिंदे यांनी ही मोहीम सुरु केली आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *