Headlines

Aai Kuthe Kay Karte : मॉर्डन कपड्यावरून झापलं,अभिनेत्रीचे ट्रोलर्सना प्रत्युत्तर

[ad_1]

Aai Kuthe Kay Karte Madhurani Prabhulkar : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिका ‘आई कुठे काय करते’ हिने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. या मालिकेतील एका प्रसिद्ध अभिनेत्रीला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. मॉर्डन कपड्यावरून तिला एका ट्रोलरने ट्रोल केले होते. या ट्रोलरला आता तिने तिच्या शब्दात सुनावले आहे. दरम्यान नेमकं प्रकरण काय आहे? हे जाणून घेऊयात. 

‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेतील मुख्य चेहरा म्हणजे अरूंधती. या अरूंधतीचे खरे नाव मधुराणी गोखले प्रभूलकर (Madhurani Prabhulkar). अरूंधती तिच्या अभिनयामुळे नेहमीच चर्चेत असते, मात्र प्रथमच ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. कारण तिला तिच्या मॉर्डन कपड्यावरून ट्रोल करण्यात आले होते. या ट्रोलर्सना तिने सडेतोड उत्तर दिलेय.

पोस्टमध्ये काय? 

मधुराणीने (Madhurani Prabhulkar) नुकताच लेकीसोबतचा एक फोटो इन्स्टाग्रावर पोस्ट केला होता. हा फोटो शेअर करत तिने ‘आई आणि मुलीचा व्हेकेशन टाईम’ अशी कॅप्शन लिहली होती. विशेष म्हणजे मालिकेत नेहमी ती साडीमध्ये दिसायची आणि तिने इन्स्टाग्रामवर मॉर्डन लुकमधले फोटो पोस्ट केले होते. हा तिचा मॉर्डन लुक एका नेटकऱ्यांना खटकला आहे आणि त्यांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली होती.

अभिनेत्रीला केलं ट्रोल

सभ्य भूमिका केल्यानंतर मॉडर्न लुक मधील फोटो काढून शेअर करण्याचे काय कारण आहे? विवाहित स्त्रिया काहीही असो कुंकू लावतात. आणि कुंकू लावल्यामुळे त्यांना कोणी मॉडर्न रोल देणार नाही असे नाही, असे ट्रोलरने म्हटलेय. पुढे तो म्हणतो, मालिकेत सभ्य भूमिका केल्यानंतर त्यांच्या आपल्या मुलींना असा आदर्श घालून देणे हे कितपत योग्य आहे? असा सवाल केला. यासोबत दाक्षिणात्य अभिनेत्रींचा दाखला देत म्हणाला की, दाक्षिणात्य अभिनेत्री त्यांच्या पारंपरिक पद्धतीच्या वेशभूषा वैयक्तिक आयुष्यात प्रकर्षाने पाळतात. अशी कमेंट करून त्याने मधुराणीला (Madhurani Prabhulkar) ट्रोल करण्याचा प्रयत्न केला.  

ट्रोलर्सना सडेतोड उत्तर 

नेटकऱ्याने ट्रोल केल्यानंतर मधुराणीने (Madhurani Prabhulkar) त्याला सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. ‘मी वैयक्तिक आयुष्यात काय करायचं हे मला सांगणारे तुम्ही कोण? मराठी परंपरेचा इतका पुळका आहे तुम्हाला मग तुम्ही पाश्चात्य लोकांचा ब्लेझर घालून फोटो का काढलाय? मराठी पेहराव करायला हवा होतात ना’, असा खडा सवालच मधुराणीने उपस्थित करत त्याला झापलं. 

दरम्यान मधुराणीने सध्या आई कुठे काय करते या मालिकेतून काहिसा ब्रेक घेतला आहे. या ब्रेकमध्ये ती तिच्या मुलीसोबत वेळ घालवताना दिसत आहे. या दरम्यान मधुराणीची ही तिखट प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *