Headlines

RC वरील पत्ता ऑनलाईन असा करा अपडेट, लगेच होईल काम, पाहा स्टेप्स

[ad_1]

नवी दिल्ली: RC Update: तुम्ही नवीन ठिकाणी कायमस्वरूपी राहायला गेले असल्यास किंवा तुमच्या कारच्या नोंदणी प्रमाणपत्रावरील पत्ता बदलू इच्छित असल्यास, एक सोपा मार्ग आहे. मोटार वाहन कायदा १९८८ नागरिकांना मोटार वाहन नोंदणी प्रमाणपत्रावर म्हणजेच आरसीवर मालकाचा निवासी पत्ता बदलण्याची परवानगी देतो. १४ दिवसांच्या आत घराच्या पत्त्यातील बदलाच्या रेकॉर्डिंगची विनंती करू शकता. तुमच्या वाहनाच्या आरसीवर तुमचा पत्ता ऑनलाइन बदलण्यात तुम्हाला मदत करण्यासाठी आम्ही स्टेप बाय स्टेप प्रोसेस सांगणार आहोत.

वाचा: Snapdragon 870 प्रोसेसर आणि ८० W चार्जिंगसह Realme GT Neo 3T भारतात लाँच, पाहा किंमत

परिवहन सेवेच्या अधिकृत वेबसाइटनुसार आवश्यक कागदपत्रे:

फॉर्म 33 वर अर्ज नोंदणी प्रमाणपत्र, नवीन पत्ता पुरावा, वैध विमा प्रमाणपत्र, प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र, फायनान्सरकडून ना हरकत प्रमाणपत्र, स्मार्ट कार्ड शुल्क, पॅन कार्ड किंवा फॉर्म 60 आणि फॉर्म 61 ची प्रमाणित प्रत, चेसिस आणि इंजिन पेन्सिल प्रिंट, मालकाची स्वाक्षरी (काही राज्यांमध्ये (*) द्वारे सूचित दस्तऐवज आवश्यक असू शकतात)

वाचा: वाढताहेत Smartphone Blast च्या घटना, फोन वापरताना घ्या काळजी, आजच बदला ‘या’ १० सवयी

सर्वप्रथम रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय वाहन ई-सेवांच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. लॉगिन बटणावर क्लिक करा. स्क्रीनवर दर्शविल्याप्रमाणे तुमचा User ID, पासवर्ड, सुरक्षा कोड प्रविष्ट करा आणि सबमिट बटण दाबा. Online Service वर क्लिक करा. वाहन संबंधित सेवा निवडा. तुमचा वाहन नोंदणी क्रमांक आणि चेसिस क्रमांकाचे शेवटचे ५ अंक एंटर करा. जनरेट OTP बटणावर क्लिक करा. तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर पाठवलेला OTP एंटर करा, सबमिट करा RC पर्यायामध्ये पत्ता बदला पर्याय निवडा आणि नंतर सबमिट बटणावर क्लिक करा.

डावीकडील मेनूवरील RC पर्यायातील पत्ता बदला वर क्लिक करा. सर्व तपशील प्रविष्ट करा आणि सबमिट बटणावर क्लिक करा. Service Details टॅब अंतर्गत उपस्थित विमा पॉलिसी पर्याय भरा. आणि नंतर सबमिट बटणावर क्लिक करा. DMS (अपलोड डॉक्युमेंट्स) पर्यायावर क्लिक करा. सेवा तपशील टॅब अंतर्गत अपॉइंटमेंट पर्यायावर क्लिक करा. स्लॉट उपलब्ध आहे ती तारीख निवडा. Book Now बटणावर क्लिक करा. फी तपशील पर्यायावर क्लिक करा आणि आवश्यक तपशीलांसह पेमेंट करा. पेमेंट गेटवे निवडा आणि सुरू ठेवा बटण दाबा.

पैसे भरल्यानंतर पावती येईल. पावतीची प्रिंट काढा. तुम्हाला तुमची पावती आणि इतर मूळ कागदपत्रांसह आरटीओकडे जाण्यास सांगितले जाईल. सबमिशन आणि कागदपत्र पडताळणीनंतर वाहन नोंदणी प्रमाणपत्रावर तुमचा पत्ता बदलला जाईल.

वाचा: बेस्टच ! Reliance Jio च्या ‘या’ टॉप-ट्रेंडिंग प्लान्समध्ये ५६ GB डेटासह Disney + Hotstar फ्री, किंमत ५०० रुपयांपेक्षा कमी

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *