Headlines

रवी राणांसोबतच्या वादानंतर आता पुढे काय? आगामी निवडणुकीत कोणाशी युती? बच्चू कडू म्हणाले… | bacchu kadu said prahar janshakti party will contest on 15 seats in upcoming state assembly election

[ad_1]

बडेनेराचे आमदार रवी राणा आणि अचलपूरचे आमदार तथा माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यातील वाद पुन्हा पेटला आहे. ‘धमकी देणाऱ्यांना घरात घुसून मारू,’ असे रवी राणा म्हणाले आहेत. त्यानंतर बच्चू कडू यांनीदेखील ‘ते तलवार घेऊन आले, तर आम्ही फुल घेऊन उभे राहू,’ असे प्रत्युत्तर दिले आहे. दरम्यान, या सर्व वादानंतर आगामी विधानसभा तसेच लोकसभा निवडणूक लक्षात घेता बच्चू कडू यांची भूमिका काय असेल, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. त्यावर आता खुद्द बच्चू कडू यांनीच भाष्य केले आहे. आमची कोणासोबतही युती हो शकते. आम्ही आगामी विधानसभा निवडणुकीत १० ते १५ जागा लढवणार आहोत, असे बच्चू कडू म्हणाले आहेत. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.

हेही वाचा >>> निवडणुकीच्या तारखा घोषित होताच केजरीवाल यांचा गुजराती भाषेत व्हिडीओ; श्रीराम, अयोध्येचा उल्लेख करत म्हणाले, “फक्त एक…”

“राजकारणात सैनिकासारखे जगावे लागते. आम्ही कोणत्या जागेवर उमेदवार उभे करणार, हे अद्याप ठरायचे आहे. आम्ही त्या जागांचा शोध घेत आहोत. आमचा पक्ष लहान आहे. पैसे नाहीयेत. नेतेही नाहीयेत. आम्ही कार्यकर्ते आहोत. याच कारणामुळे समोर काय रणनीती ठरवायची यावर अभ्यास करत आहोत. पूर्ण सहा महिने आम्ही अभ्यास करणार आहोत. १० ते १५ जागा आम्ही निश्चित करून त्या जागांवर आम्ही लढणार आहोत,” असे बच्चू कडू यांनी सांगितले.

हेही वाचा >> ‘उद्धव ठाकरेंशी युतीबाबत फोनवरून चर्चा?’; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “माध्यमांनी लग्न…”

आमची युती कोणाशीही होऊ शकते. सध्याच्या पाच वर्षात सगळेच पक्ष सत्तेत होते. दिल्लीमध्ये २४ पक्षांचे सरकार बनले. रजकारणात एक आणि एक दोन होत नसतात. त्यामुळे राजकारणाचा तळ शोधू नये, असेही बच्चू कडू म्हणाले.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *