Headlines

श्रीवल्ली वादात! चिकन बर्गरची जाहिरात केल्याने रश्मिका मंदाना ट्रोलर्सच्या निशाण्यावर, काय आहे नेमकं प्रकरण

[ad_1]

Rashmika Mandanna Trolled on Eating Chicken Burger in Ad: रश्मिका मंदाना ही आजची एक (Rashmika Mandanna Trolled) आघाडीची अभिनेत्री आहे. परंतु तिच्या एका जाहिरातीमुळे मात्र रश्मिका ट्रोल झाली आहे. मध्यंतरी आपण शाकाहरी असल्याचे रश्मिकानं सांगितले होते परंतु आता चिकन बर्गरच्या जाहिरातीमुळे प्रेक्षकांनी मात्र तिच्यावर टीका केली आहे. नक्की हा प्रकार आहे तरी काय, असा प्रश्न तुमच्या मनात घर करून बसला असेलच. ‘पुष्पा’ या 2021 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटातून अभिनेत्री रश्मिका मंदाना हिच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली होती.

अवघ्या 26 वर्षांच्या रिश्मिकाला फारच लहान वयात अमाप लोकप्रियता मिळाली होती. परंतु सध्या पुष्पाची श्रीवल्ली वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. सध्या दाक्षिणात्त्य चित्रपटांमध्ये सर्वात लोकप्रिय अभिनेत्री म्हणून रश्मिकाचे नावं घेतले जाते. 

इन्टाग्रामवर रश्मिकानं एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती एका मोठ्या जंक फूड ब्रॅण्डच्या चिकन बर्गरची (Rashmika Mandanna Viral Video) जाहिरात देताना दिसते आहे. परंतु रश्मिकानं फक्त चिकन बर्गरची अॅड दिल्यामुळे ती ट्रोल झाली नसून यामागील कारणं वेगळं आहे. याआधी तिनं अनेक मुलाखतींमधून सांगितले आहे की, ती मासांहर करत नाही आणि सोबतच आपण शाहाकारी असल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे रश्मिका ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. 

काय आहे प्रकरण? 

सध्या तिनं पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये रश्मिका ही चिकन बर्गर एन्जॉय (Chicken Burger Ad Rashmika Mandanna) करताना दिसते आहे. त्यासोबत ते हे बर्गरही प्रमोट करते आहे. स्वत:हूनच मासांहर न करणारी रश्मिका आता चिकन बर्गर प्रमोट करताना दिसते आहे म्हणून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. एकीकडे आपण मासांहर न केल्याचे सांगणारी रश्मिका मंदाना आता चिकन बर्गरची सर्रास जाहिरात करताना दिसते आहे. त्यामुळे नेटकरी अधिकच संतापले आहेत. हा व्हिडीओही सध्या सगळीकडेच व्हायरल होतो आहे. 

हेही वाचा – 100 वर्षांपुर्वी मराठमोळ्या अभिनेत्यानं गाजवली होती राम आणि सीतेचे भुमिका; तुम्हाला ठाऊकये ही रंजक गोष्ट?

ट्रोलर्स भडकले

यावेळी रश्मिकाही ट्रोलर्सच्याही निशाण्यावर आली आहे. अनेकांनी तिला म्हटलं आहे की, हे सेलिब्रेटी पैशांसाठी काहीही करू शकतात तर दुसऱ्यानं म्हटलंय की, रश्मिका ही डबल सॅण्डर्ट्स आहे तर अनेकांनी म्हटंलय की रश्मिका खोटं बोलते. अशा तिखट शब्दात ट्रोलर्सची तिची शाळा घेतली आहे. सध्या सगळीकडेच हा व्हिडीओ चर्चाचा विषय ठरला आहे. नुकतीच रश्मिका मंदाना ही अमिताभ बच्चन यांच्यासह ‘गुडबाय’ या हिंदी चित्रपटातून दिसली होती. त्यानंतर आता ती रणबीर कपूरच्या ‘एनिमल’ (Animal) या चित्रपटातून लवकरच रूपेरी पडद्यावरून दिसणार आहे. सध्या ट्रोलर्समुळे रश्मिका मंदाना अडचणीत आली आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *