Headlines

100 वर्षांपुर्वी मराठमोळ्या अभिनेत्यानं गाजवली होती राम आणि सीतेचे भुमिका; तुम्हाला ठाऊकये ही रंजक गोष्ट?

[ad_1]

1st Film on Ramayan in india: ‘आदिपुरूष’ चित्रपटाचा (Adipurush Trailer) ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे सगळीकडेच पुन्हा एकदा चर्चा आहे ती म्हणजे रामायणाची. लहानपणापासून आपण रामायणाची गोष्ट वाचतो आहोत. आपल्या सगळ्यांच्याच मनात ही कथा घर करून आहे. या रामायणावर अनेक चित्रपट आले तसेच मालिकाही आल्या. आता दिग्दर्शक ओम राऊत यांचा बिग बजेट चित्रपट आदिपुरूषही प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. परंतु तुम्हाला माहितीये का की रामायण (Ramayan First Film) या विषयावर तयार झालेला पहिला चित्रपट कोणता ते?

या चित्रपटात मराठमोळ्या अभिनेत्यानं साकारली होती राम आणि सीतेचीही भुमिका. त्यावेळी हा चित्रपट प्रचंड गाजला होता. तुम्हाला माहितीये का या चित्रपटाच्या मागील रंजक गोष्ट काय आहे? (lanka dahan was the first film made in india where ram and sita role played by anna salunke)

येत्या काही काळात रामायणावर अनेक मालिका बनल्या आहेत. त्याचसोबतच चित्रपटही. परंतु रामायणाची कथा ही प्रत्येकाला मोहित पाडणारी आहे. आम्ही तुम्हाला गोष्ट सांगतोय ती म्हणजे 1917 साली प्रदर्शित झालेल्या ‘लंकादहन’ (Lanka Dahan) या चित्रपटाविषयी सांगतो आहोत. हा चित्रपट आजपासून 116 वर्षांपुर्वी म्हणजेच ज्यावेळी भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवली गेली त्या काळी हा चित्रपट बनवण्यात आला होता. ज्या काळी आजच्यासारखे तंत्रज्ञानही नव्हते. ‘आदिपुरूष’ या चित्रपटासाठी मोठंमोठं व्हिएफएक्स तंत्रज्ञान वापरलं गेलं आहे. परंतु त्यावेळी फक्त एका कॅमेऱ्यावरून हा चित्रपट शूट करण्यात आला आहे आणि या चित्रपटाचे दिग्दर्शन होते खुद्द भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके. 

कोण होते अण्णा साळुंखे? 

‘लंकादहन’ या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन  दादासाहेब फाळके यांनीच केले होते. शंभर वर्षांपुर्वीचा तो काळ, तेव्हा चित्रपट पाहायला महिला कलाकार सहजी काम करायला येण्याचे चिन्ह नव्हते. अशा काळात पुरूषचं स्त्रियांची भुमिका करायचे. दादासाहेब फाळके यांनी त्या काळी महिलांनी अभिनेत्री व्हावे म्हणून अपार प्रयत्न केले परंतु त्यावेळी स्त्री कलाकार भेटणं कठीणचं होते. अशावेळी त्यांनी स्त्रीपात्र साकारण्यासाठी पुरूष कलाकारांना नेमलं आणि त्यातील नावं होतं (Anna Salunkhe) अण्णा सांळुखे.

अण्णा सांळुखे यांनी त्या काळात इतिहास रचला होता. पुरूष असूनही त्यांनी त्यावेळी त्यांनी साकारलेल्या स्त्री भुमिका या अजरामर ठरल्या होत्या. फार कमी लोकांना याविषयी माहिती असेल. अण्णा सांळुखे हे दिसायला देखणे होते. त्यांनी अनेक स्त्रीपात्र रंगवली आहेत. त्यांनी 1913 साली आलेल्या ‘राजा हरिश्चंद्र’ या मूकपटातून राणी तारामतीची भुमिका साकारली होती. 

हेही वाचा – अल्लू अर्जून, सलमान खान, आमिर खान म्हातारे झाल्यावर ‘असे’ दिसतील; AI फोटोज पाहून चक्रावून जाल

‘त्या’ काळच्या बॉक्स ऑफिसवर ठरला होता हीट

लंकादहन हा चित्रपट 1917 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांनी तूफान प्रतिसाद दिला होता. या चित्रपटासाठी मैलभर रांगा लागत होत्या. या चित्रपटानं (Lanka Dahan Box Office Collection) 10 दिवसात, त्या काळी, 35 हजारांची कमाई केली होती. असं म्हणतात की, पैशांनी भरलेल्या पिशव्या या बैलगाडीतून नेल्या जायच्या. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *