Headlines

रणवीर सिंगनंतर आता क्रिती खरबंदाचा बोल्ड अवतार चर्चेत!

[ad_1]

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री क्रिती खरबंदा काही बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसली आहे. मात्र, कमी चित्रपटांमधूनच या अभिनेत्रीने प्रेक्षकांमध्ये ओळख निर्माण केली आहे. चित्रपटांव्यतिरिक्त आपल्या सौंदर्यासाठी लोकप्रिय असलेली ही अभिनेत्री सोशल मीडियावरही सक्रिय असते. ती दररोज तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते. दरम्यान, अभिनेत्रीने अलीकडेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. 

क्रितीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर स्वतःचे दोन फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये क्रिती स्विमिंग पूलमध्ये पोज देताना दिसत आहे. पांढऱ्या बिकिनीतील क्रितीची ही स्टाईल तिच्या चाहत्यांची मनं जिंकत आहे. हे फोटो शेअर करताना क्रितीनं कॅप्शनमध्ये Mermaid लिहिले. चाहत्यांना हे फोटो प्रचंड आवडले आहेत. पाण्यात पोज देणारी क्रिती ही खरंच एका जलपरीसारखी दिसत आहे. 

अभिनेत्रीच्या या फोटोंना आतापर्यंत एक लाखपेक्षा अधिक लोकांनी लाईक केले आहे. याशिवाय तिच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी  कमेंट केली आहे. चाहते सतत कमेंट करून क्रितीचं कौतुक करत आहेत. एका नेटकऱ्याने कमेंट करत म्हटलं की, तू खूप सुंदर दिसत आहे. दुसरा एक नेटकरी म्हणाला, तू खरंच एका जलपरीसारखी दिसत आहेस. तिसरा नेटकरी म्हणाला, गोंडस. अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी क्रितीच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे. 

तिच्या करिअरबद्दल बोलायचे तर, क्रितीनं अभिनेता राजकुमार रावसोबत ‘शादी में जरूर आना’ या चित्रपटात आणि प्रसिद्ध कॉमेडी फ्रँचायझी ‘हाउसफुल 4’ मध्ये देखील दिसली आहे. चित्रपटांव्यतिरिक्त ती सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी सतत जोडलेली असते. ती दररोज तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *