Headlines

सांगोला येथे रानभाजी महोत्सव कार्यक्रम संपन्न

सांगोला -10आँगस्ट 2021रोजी सांगोला येथील नवीन भाजी मंडई(आठवडे बाजार) येथे महाराष्ट्र महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालय सांगोला व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा सांगोला यांच्यातर्फे रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आमदार अँड श्री शहाजी बापू पाटील यांच्या हस्ते महोत्सवाचे उदघाटन फित कापून करण्यात आले. महोत्सवामध्ये तालुक्यामध्ये उपलब्ध होणाऱ्या जवळपास 28 रानभाज्या प्रदर्शित करण्यात आल्या व त्या प्रत्येक रानभाजीचे असणारे महत्व व आरोग्यासाठी असणारे फायदे याची सविस्तर माहिती फलक लावण्यात आली होती सदर कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आमदार अँड शहाजीबापू पाटील यांचा तालुका कृषी अधिकारी श्री आर एच भंडारे साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे.

त्यानंतर प्रास्ताविक श्री आर एच भंडारे तालुका कृषी अधिकारी यांनी केले.आमदार अँड शहाजीबापू पाटील यांनी रान भाज्यांचे महत्व आरोग्यासाठी उपयोग व त्याचा दैनंदिन आहारातील जास्तीत जास्त वापर कसा करता येईल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे तसेच रानभाज्या पिकवण्यावर व त्यासाठी मार्केट, कृषी विभागाच्या वतीने अशा प्रकारच्या रानभाज्या उत्पादक व ग्राहक कसे तयार होतील, लोकांमध्ये रानभाज्या विषयी जनजागृती करण्यासाठी अशा प्रकारचे मेळावे गावोगावी भरवण्यात यावेत असे सुचवले.त्यानंतर आमदार साहेबांच्या हस्ते रानभाज्या घेऊन आलेल्या शेतकरी गटातील सदस्यांचा सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री.यु.ई चंदनशिवे कृषी सहाय्यक यांनी केले व आभार प्रदर्शन श्री शेजवळ कृषी सहाय्यक यांनी केले. रानभाजी महोत्सवासाठी पंचायत समिती कृषी अधिकारी श्री काळुंगे कृषी अधिकारी नेवरे ,मंडळ कृषी अधिकारी मुळे, श्री अभंग, श्री खंडागळे कृषी अधिकारी ,श्री जाधव ,कृषी पर्यवेक्षक ,कृषी सहाय्यक व सेंद्रिय शेती गटाचे सदस्य शेतकरी गटाचे सदस्य शेतकरी कृषी मित्र उपस्थित होते सदर या कार्यक्रमासाठी आत्माचे बी.टी,एम श्री पोळ, ए.टी.एम श्री सोनवणे यांनी यशस्वीरित्या पार पाडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *