Headlines

मोदींना शेवटचा शेती उद्योग हा भांडवलदारांच्या ताब्यात द्यायचा आहे- कॉम्रेड ठोंबरे तानाजी

बार्शी – मोदींना शेवटचा उद्योग शेती उद्योग भांडवलदारांच्या ताब्यात घ्यायचा आहे यासाठी मोदींची गडबड आहे. स्वतःची नावे देण्यासाठी ते काम करत आहेत. भांडवलदारांचा हस्तक म्हणून त्यांची ही भूमिका आहे. भांडवली व्यवस्था क्रुर करून फसवेगिरी करणे हा त्यांचा उद्योग आहे. चळवळीतील काम करणाऱ्या व्यक्ती पेगासेस च्या मदतीने लक्ष ठेवणे. श्रमिकांच्या नेत्यांना जेलमध्ये कोंडून मारून टाकणे हे त्यांचे धोरण आहे याला तीव्र विरोध लालबावटा करेल असे कॉम्रेड तानाजी ठोंबरे म्हणाले. ठोंबरे हे दिनांक 9 ऑगस्ट 2021 वार सोमवार रोजी भारतीय कम्युनिस्ट पक्ष, आयटक कामगार केंद्र, अखिल भारतीय किसान सभा, ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन च्या वतीने आयोजित केलेल्या केंद्र सरकारच्या धोरणांच्या विरोधामधील धरणे आंदोलनामध्ये बोलत होते.

निवेदनामध्ये तीन कृषी कायदे रद्द करावेत, कामगार विरोधी चार लेबर कोड मागे घ्यावे, किमान वेतन 21 हजार रुपये करावे, पेन्शन सात हजार रुपये द्यावे, शेतकऱ्यांना पीक विमा कर्ज वाटप करावे, विद्यार्थ्यांची फी माफ करा, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात या मागण्या करण्यात आले आहेत.

आंदोलन यशस्वी करण्यासाठी कॉम्रेड तानाजी ठोंबरे, कॉम्रेड ए.बी.कुलकर्णी, कॉम्रेड लहू आगलावे, कॉम्रेड धनाजी पवार, कॉम्रेड, कॉम्रेड भारत भोसले, कॉम्रेड प्रवीण मस्तूद, कॉम्रेड अनिरुद्ध नखाते, कॉम्रेड पवन आहिरे, कॉम्रेड बालाजी शितोळे, कॉम्रेड सुयश शितोळे, कॉम्रेड भारत पवार, कॉम्रेड लक्ष्मण घाडगे, रशिद इनामदार, दत्तात्रय कदम, बापू सुरवसे, बालाजी दळवी, सतिश गायकवाड, मुलांनी मुबारक, संजय पवार, सुरेश कुंभार, खंडू कोळी, प्रकाश जेपीथोर, रविंद्र लाटे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *