Headlines

ramdas athavle rpi demands ministerial birth in eknath shinde cabinet

[ad_1]

महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन होऊन दोन आठवडे उलटून गेल्यानंतर देखील अद्याप मंत्रीमंडळ विस्तार झाला नसल्यामुळे चर्चा सुरू झाली आहे. अनेक नावांवरून तर्क-वितर्क लढवले जात आहेत. शिंदे गट आणि भाजपा यांच्यामध्ये मंत्रीपदांची वाटणी नेमकी कशी केली जाणार? यावरून चर्चा सुरू झाली आहे. त्यात सर्वोच्च न्यायालयात बंडखोर आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील सुनावणी प्रलंबित असल्यामुळे या आमदारांवर देखील टांगती तलवार आहे. या पार्श्वभूमीवर रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी देखील नव्या सरकारमधील अपेक्षित पदांविषयी मागणी केली आहे. तसेच, आपल्याकडेही मंत्रीपदासाठी इच्छुक १०० हून जास्त नावं आल्याचा देखील दावा त्यांनी केला आहे.

रामदास आठवलेंनाही हवंय रिपाइंसाठी मंत्रीपद!

राज्यात नव्याने स्थापन झालेल्या सरकारमध्ये रिपाइंसाठी मंत्रीपद मिळण्याची अपेक्षा रामदास आठवलेंनी व्यक्त केली आहे. “एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांचं सरकार राज्यात आहे. त्यात आम्हाला एक मंत्रीपद मिळावं, ३-४ चेअरमनपदं, काही उपाध्यक्षपदं आणि महामंडळांवर आरपीआयचे प्रतिनिधी घ्यावेत अशी मागणी आम्ही केली आहे”, असं रामदास आठवले पत्रकार परिषदेत म्हणाले आहेत.

“मंत्रीपदं देण्याची वेळ आलेली आहे. त्याप्रमाणे एनडीएमधील आम्ही घटकपक्ष आहोत. माझ्या पक्षाला एक तरी मंत्रीपद मिळायला हवं, हा आग्रह मी देवेंद्र फडणवीसांकडे धरला आहे. बाकीच्या घटकपक्षांनाही सत्तेमध्ये सहभागी करून घ्यावं. मी फडणवीसांना भेटलो आहे. त्यांनी सांगितलंय की सुरुवातीचं मंत्रीमंडळ छोटं असणार आहे. पहिल्या वेळेत आरपीआयला संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. पण मंत्रीमंडळ विस्तार होईल, तेव्हा रिपाइंचा विचार केला जाईल”, असं आठवले यावेळी म्हणाले.

“सगळ्यांचं म्हणणं आहे की आमचाही विचार व्हावा”

“आमच्या कार्यकर्त्यांची फार मोठी अपेक्षा आहे. माझ्याकडे मंत्रीपदासाठी १०० पेक्षा जास्त नावं आली आहेत. सगळ्यांचं म्हणणं आहे की आम्ही इतकी वर्ष तुमच्यासोबत काम करत आहोत. त्यामुळे आमचा विचार व्हावा, अशी अनेकांची भावना आहे”, असं रामदास आठवलेंनी यावेळी नमूद केलं.

“उद्धव ठाकरेंचा जनाधार तुटला आहे”

दरम्यान, उद्धव ठाकरेंवर देखील रामदास आठवलेंनी भूमिका स्पष्ट केली. “उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा जनाधार तुटला आहे. ४० आमदार एकनाथ शिंदे गटात गेले आहेत. रोज शिवसेना आणि उद्धव ठाकरेंना सोडणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरेंना कुणाच्यातरी मदतीची गरज आहे. म्हणून ते म्हणत आहेत की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी व्हायला हवी”, असं देखील आठवले यावेळी म्हणाले.

मनसेला मंत्रिपद दिले जात असेल तर आमचा त्याला विरोध – रामदास आठवले

“मी आधी भाजपा आणि शिवसेनेला एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करत होतो. पण तेव्हा उद्धव ठाकरे ऐकायला तयार नव्हते. तेव्हा जर उद्धव ठाकरेंनी निर्णय घेतला असता, तर आज शिवसेनेत ही बंडखोरी झाली नसती. कदाचित एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना सोडलं नसतं. पण आता आम्हाला उद्धव ठाकरेंची गरज नाही. एकनाथ शिंदेंसारखा कार्यकर्ता आमच्यासोबत आहे. त्यामुळे आता दोघांना एकत्र आणण्याचा विषय आता शिल्लक राहिलेला नाही”, असं देखील आठवले म्हणाले.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *