चंदीगड : आम आदमी पार्टीने (आप) भगवंत मान यांना पंजाबमध्ये पक्षाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भगवंत मान संगरूर जिल्ह्यातील धुरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. आप नेते राघव चढ्ढा यांनी गुरुवारी ही घोषणा केली.
धुरी विधानसभेच्या जागेवर सध्या सत्ताधारी पक्ष काँग्रेसचा कब्जा असून पक्षाचे दलविंदरसिंग खंगुरा ‘गोल्डी’ हे सध्या येथून आमदार आहेत. भगवंत मान हे सांगरूर लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा ‘आप’चे खासदार आहेत.
आप पंजाबचे सह-प्रभारी राघव चढ्ढा म्हणाले, “मला कळविण्यात आनंद होत आहे की ‘पंजाब के आन बान, हमारे मान’ भगवंत मान धुरी विधानसभेतून निवडणूक लढवणार आहेत.” ते संगरूर जिल्ह्यात येते, जिथे भगवंत मान यांचे घरही आहे.
- प्रेम आणि नात्याचा अनुबंध उलगडणारा ‘लेक असावी तर अशी’, ट्रेलर तुम्ही पाहिलात का?
- 32 वर्षांपासून बेपत्ता आहे ‘हा’ अभिनेता; कोण म्हणालं वेड्यांच्या इस्पितळात कोण, म्हणालं रस्त्यांवर दिसला, सत्य काय?
- ‘कभी खुशी कभी गम’मधील शाहरुख- काजोलचा ऑनस्क्रीन मुलगा आता कायच्या काय हॅण्डसम दिसू लागलाय, Photo पाहिले?
- ‘Chamkila’ चित्रपट आणि अमिताभ बच्चन यांचं काय आहे कनेक्शन?
- 2 महिन्यानंतर कोमातून बाहेर आली 25 वर्षीय Adult Star; ‘त्या’ रुममध्ये फेब्रुवारीत काय घडलं? गूढ कायम
आपचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी भगवंत मान यांची पंजाब निवडणुकीसाठी पक्षाचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून घोषणा केली. ‘आप’ने केलेल्या टेलिव्होट प्रचारात भगवंत मान यांना 93 टक्क्यांहून अधिक मते मिळाली. यानंतर त्यांना पक्षाचा मुख्यमंत्री चेहरा घोषित करण्यात आला.
117 सदस्यीय पंजाब विधानसभेसाठी 20 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून मतमोजणी 10 मार्च रोजी होणार आहे. या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेसशिवाय आम आदमी पक्षाचा सामना भाजप-अमरिंदर सिंग यांच्या पंजाब लोक काँग्रेस आघाडी आणि अकाली दल-बसपा आघाडीशी होणार आहे.