Headlines

पुन्हा एकदा रत्ना पाठक शहा ट्रोलर्सच्या निशाण्यावर, जाणून घ्या नेमकं प्रकरण

[ad_1]

मुंबईः रत्ना पाठक शहा या बॉलीवूडमधील नामवंत अभिनेत्री आहेत. त्या गेली 40 वर्षे बॉलीवूडच्या अभिनेत्री असून विख्यात नाट्य-सिनेअभिनेते नसिरूद्दिन शहा यांच्या त्या पत्नी आहेत. त्यांचे अनेक सिनेमे गाजले असून त्यापैंकी ‘कपूर अँड सन्स’, ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ आणि ‘जाने तू या जाने ना’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी लक्षवेधी भुमिका साकारल्या आहेत.

सहा वर्षांपुर्वी प्रदर्शित झालेला ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला होता तेव्हा या चित्रपटाच्या वादावरून रत्ना पाठक शहा यांनी आक्रमक भुमिका घेतली होती. मध्यतंरी नसिरूद्दिन शहा यांचेही एक वक्तव्य वादग्रस्त ठरले होते. आता पुन्हा रत्ना पाठक शहाही वादाच्या सापळ्यात अडकल्या आहेत. 

रत्ना पाठक शहा यांनी करवा चौथच्या सणावर नुकतीच एक वादग्रस्त कमेंट केली होती त्यावर आता त्यांना ट्रोलर्सनी उत्तर द्यायला सुरूवात केली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की एकविसाव्या शतकातील स्त्रिया करवा चौथसारख्या पुरातन प्रथा पाळत आहेत आणि स्त्रियांनी आपल्या पतीच्या जीवनासाठी उपवास करणे ‘भयानक’ आहे. आता त्याच्या या वक्तव्यामुळे त्यांना ट्विटर युजर्सकडून मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे.

एका ट्विटर युजरने लिहिले की, “#रत्नापाठकशाह त्यांचा नवरा नसीरुद्दीन शाह यांचे आडनाव का आहे, ते अंधश्रद्धाळू किंवा प्रतिगामी, पुराणमतवादी नाही का, रत्ना पाठक शहा या नसीरुद्दीन शहा यांच्या दुसरी पत्नी आहेत”

नुकत्याच एका वृत्तसमूहाशी बोलताना रत्ना पाठक शहा म्हणाल्या होत्या. “मागील वर्षी मला कोणीतरी पहिल्यांदा विचारले की मी ‘करवा चौथ का व्रत’ ठेवते का? मी म्हणाले, ‘मी वेडी आहे का?’ आधुनिक सुशिक्षित स्त्रिया करवा चौथ करतात, नवर्‍याच्या प्रदीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करतात.. हे भयंकर नाही का?खरंच? 21 व्या शतकात आपण असं बोलतोय का? सुशिक्षित स्त्रिया असं करताना दिसायत हे चित्र फार गंभीर आहे.”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होत

त्यावरून सध्या ट्विटरवर त्यांच्या या वक्तव्याला घेऊन रणधुमाळी माजली आहे. अनेक ट्रोलर्सनी त्यांना प्रचंड प्रमाणात ट्रोल करायला सुरूवात केली आहे. 

रत्ना पाठक शहा यांची साराभाई vs साराभाई ही मालिका खूपच गाजली होती. नुुकत्याच सुरू झालेल्या मालिकेच्या नव्या पर्वालाही चाहत्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *