Headlines

प्रायव्हेट पार्टपासून विवस्त्र होण्यापर्यंत…’या’ अभिनेत्रींकडे साजिद खानच्या विचित्र मागण्या

[ad_1]

मुंबई : बॉलिवूड दिग्दर्शक साजिद खान (Sajid Khan) हा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. काही वर्षांपूर्वी साजिदवर काही अभिनेत्रींनी लैंगिक शोषणाचे #MeToo चे आरोप केले. तेव्हापासून चित्रपटसृष्टीमुळे लांब असलेला साजिद सध्या एका शोचा भाग आहे. त्यामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 

सलोनी चोप्रा – सलोनी चोप्रा (Saloni Chopra) ही भारतीय-ऑस्ट्रेलियन अभिनेत्री असून तिने साजिद खानसोबत ‘हाऊसफुल 2’ या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं. सलोनीनं साजिदवर आरोप केला होता की, साजिदनं तिला विनाकारण फोन करून अस्वस्थ केलं होतं. एवढंच नाही तर, साजिदनं तिला मास्टरबेडविषयी विचारले होते आणि तिच्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श करण्यासही सांगितले, असा दावाही सलोनीने केला होता. मात्र तिनं हे करण्यास नकार दिल्याने साजिद तिच्यावर चिडला.

रेचेल व्हाइट – हिंदी आणि बंगाली चित्रपटांची अभिनेत्री रेचेल व्हाइटनं (Rachel White) सलोनीला पाठिंबा देत सांगितलं की, ‘हमशकल्स’च्या शूटिंगदरम्यान साजिदनं तिला घरी बोलावलं होतं आणि आपल्या चित्रपटात भूमिका देण्याऐवजी तिचे कपडे काढण्यास सांगितले होते.

सिमरन सूरी – ‘हिम्मतवाला’ चित्रपटाच्या ऑडिशनदरम्यान साजिदनं तिला कपडे काढण्यास सांगितले होते, असा दावा अभिनेत्री सिमरन सूरीने (Simran Suri) केला होता. तिच्या म्हणण्यानुसार, हा सर्व प्रकार तेव्हा घडला जेव्हा साजिदनं तिला त्याच्या जुहूच्या घरी बोलावले होते. सिमरनच्या मते, साजिदचे बोलणे ऐकून तिला धक्काच बसला.

आणखी वाचा : तुमची ऑर्डर डायरेक्ट दिसणार आभाळात, काय आहे नवीन तंत्रज्ञान..

अहाना कुमरा – ‘सोना स्पा’ आणि ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ सारख्या चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारणाऱ्या अहाना कुमरानं (Aahana Kumra) #MeToo अंतर्गत साजिदवर लैंगिक छळाचा आरोप केला आहे आणि दावा केला आहे की साजिदनं त्याला 100 कोटी रुपये मिळतील तर कुत्र्यासोबत सेक्स करशील का असा प्रश्न विचारला. 

करिश्मा उपाध्यक्ष – करिश्मा उपाध्याय (Karishma Upadhyaya ) एक पत्रकार आहे आणि त्यांनी दिलेल्या माहितीनुसार साजिदनं त्यांनां अस्वस्थ केले होते. त्यांच्या म्हणण्यानुसार, साजिदने एका मुलाखतीदरम्यान त्याच्या समोर त्याचा प्रायव्हेट पार्ट दाखवला होता.

आणखी वाचा : ‘सामन्याच्या फक्त 1 दिवस आधी पत्नीसोबत…’, सूर्यकुमार यादव केला खुलासा

मंदाना करीमी (Mandana Karimi) – माजी ‘बिग बॉस’ स्पर्धक आणि अभिनेत्री मंदाना करीमी ‘बिग बॉस 16’ मधील साजिद खानच्या प्रवेशावर नाराज असून तिने बॉलिवूड सोडण्याची घोषणा केली आहे. तिच्या म्हणण्यानुसार, ‘हमशकल्स’ चित्रपटाच्या कास्टिंगदरम्यान साजिदने तिला कपडे काढण्यास सांगितले.

शर्लिन चोप्रा (Sherlyn Chopra) – साजिदवर लैंगिक छळाचे आरोप करणाऱ्यांमध्ये अभिनेत्री शर्लिन चोप्राचाही समावेश आहे. तिनं दावा केला होता की 2005 मध्ये साजिदने तिच्या समोर त्याचा प्रायव्हेट पार्ट दाखवला होता आणि तिला हातलावण्यास सांगितले होते.  

आणखी वाचा : मेरे हसबँड की शादी है’ अभिनेत्रीचा मोठा खुलासा!

जिया खान (Jiah Khan) – दिवंगत अभिनेत्री जिया खानच्या ‘डेथ इन बॉलिवूड’ या माहितीपटात साजिद खानने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले होते. जिया खानची बहीण करिश्माच्या म्हणण्यानुसार, हाऊसफुल चित्रपटाच्या रीडिंग दरम्यान साजिदनं जियाला तिचा टॉप आणि ब्रा काढण्यास सांगितले.

आणखी वाचा : ट्रान्सजेंडर गौरी सावंतचा संघर्ष येणार रुपेरी पडद्यावर

डिंपल पॉल (Dimple Paul) – मॉडेल डिंपल पॉलनं 2020 मध्ये खुलासा केला होता की एकदा साजिदनं तिला अयोग्यरित्या स्पर्श करण्याचा प्रयत्न केला होता. त्‍याने तिला त्‍याच्‍यासमोर सगळे कपडे काढण्‍यास सांगितले. डिंपलच्या म्हणण्यानुसार, त्यावेळी ती फक्त 17 वर्षांची होती.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *