Headlines

Pregnant? हृतिकसोबत सबा मित्राच्या रिसेप्शनला पोहोचताच प्रश्नांना उधाण; एक कृती ठरली कारणीभूत

[ad_1]

Hrithik Roshan Saba Azad :  बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन यानं वेळोवेळी त्याचं खासगी आयुष्य माध्यमांपासून दूर ठेवलं. पण, जेव्हाजेव्हा गरज वाटली तेव्हा मात्र तो तितक्याच मनमोकळेपणानं माध्यमांसमोर आला आणि आपल्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या गोष्टी त्यानं सर्वांपुढे मांडल्या. अशा या हृतिकनं सुझॅन खानसोबतच्या घटस्फोटानंतर बराच काळ एकट्यानं आयुष्य व्यतीत केलं. 

साधारण दीड- दोन वर्षांपासून मात्र त्याच्या आयुष्यात प्रेम परतल्याचं पाहायला मिळालं. अभिनेत्री आणि गायिका समाब आझादसोबत तो सध्या रिलेशनशिपमध्ये आहे. सुरुवातीला त्यानं हे नातं गुलदस्त्यातच ठेवलं. पण, आता मात्र तो जाहीरपणे या नात्याचा स्वीकार करताना दिसत आहे. 

मधू मंटेनाच्या रिसेप्शन सोहळ्यात सबा- हृतिकचीच चर्चा… 

हृतिक आणि सबा ही जोडी नुकतीच मधू मंटेनाच्या (Madhu Mantena) लग्नाच्या रिसेप्शन सोहळ्यासाठी पोहोचली होती. यावेळी हृतिकनं सूटला पसंती देत फॉर्मल लूक केल्याचं पाहायला मिळालं. तर, सबा मात्र चुडीदार, वेणी, पुढे एक शेला, भलीमोठी बिंदी अशा लूकमध्ये दिसली. हाय हील्सनं तिच्या लूकला चार चाँद लावले होते. 

सर्वकाही व्यवस्थितच होतं. सबा आणि हृतिक कार्यक्रमस्थळी आले आणि त्यांना तिथं माध्यमांनी फोटोसाठी थांबवलं. त्याचवेळी सबा मागे वळली आणि तिनं ओढणी व्यवस्थित केली. बरं, सबा पुन्हा समोर वळली आणि फोटोसाठी पोझ दिली. या काही सेकंदांच्या तिच्या कृतीनं अनेकांचं लक्ष वेधलं. मनोरंजन क्षेत्रातील बातम्या आणि माहिती देणाऱ्या काही माध्यमांनीही या क्षणांचा व्हिडीओ शेअर केला. 

जिथं कमेंट बॉक्समध्ये भलतेच प्रश्न विचारले गेले. हे प्रश्न होते सबा गरोदर आहे का? यासंदर्भातले. She is Pregnant…., is she Pregnant?, Pregnant hoke bhi heels? हे आणि असे काही कमेंट, त्यासंदर्भातील प्रश्न अनेकांनीच विचारण्यास सुरुवात झाली. बरं या विषयावरून कमेंटमध्येही काही नेटकऱ्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. सैल कपडे घातले म्हणजे कुणी गरोदर होतं का? अशा उपरोधिक टीकाही अनेकांनीच केल्या. 

मुळात सबा आणि हृतिकच्या नात्यात सध्या आलेला सहजपणा पाहता त्यांच्या या Relationship विषयी योग्य वेळ येताच ही मंडळीच सर्वकाही स्पष्ट करतील याचीही चाहत्यांना खात्री आहे. किंबहुना सेलिब्रिटी आणि चाहत्यांमध्ये असणारी दरी या सोशल मीडियामुळं कमी झाली असली तरीही काही मर्यादा मात्र ओलांडल्या गेल्या नाही पाहिजेत हे विसरता कामा नये. 

 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *