Headlines

​GB WhatsApp म्हणजे नक्की काय? काय आहे याचा वापर? कसं कराल डाऊनलोड? सर्व माहिती एका क्लिकवर

[ad_1]

​जीबी व्हॉट्सॲप म्हणजे काय?

​जीबी व्हॉट्सॲप म्हणजे काय?

जीबी व्हॉट्सॲप हे लोकप्रिय मेसेंजर व्हॉट्सॲपचे क्लोन ॲप आहे, जे मूळ ॲपच्या आधारे तयार केले गेले आहे आणि त्यात अनेक मनोरंजक फीचर्स उपलब्ध आहेत. अशा क्लोन केलेल्या ॲप आवृत्त्यांना मोडेड ॲप्स देखील म्हणतात. हे क्लोन ॲप अधिकृत नसल्याने ते गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करता येत नाही. हे व्हॉट्सॲप थर्ड पार्टी ॲप स्टोअरमधून डाउनलोड केले जाऊ शकते. या जीबी व्हॉट्सॲपच्या फीचर्सची माहिती देखील जाणून घेऊ…

वाचा : iOS 17 Update ने आयफोनचा चेहरामोहरा बदलणार, १० खास फीचर्सनी फोन होणार आणखी खास

​जीबी व्हॉट्सॲपचे फीचर्स

​जीबी व्हॉट्सॲपचे फीचर्स

या जीबी व्हॉट्सॲपमध्ये अनेक फीचर्स असून यातील एक म्हणजे मोठ्या आकाराच्या फाईल्स यावर पाठवता येणार आहेत. वापरकर्ते WhatsApp वर 16MB पेक्षा मोठ्या फाइल पाठवू शकत नाहीत. मोठ्या फाइल्स शेअर करण्यासाठी वापरकर्त्यांना टेलिग्रामचा वापर करावा लागतो. पण जीबी व्हॉट्सॲपच्या मदतीने युजर्स १०० एमबीपर्यंतच्या फाइल्सही पाठवू शकतात. तसंच GB WhatsApp तुम्हाला तुमच्या गोपनीयतेवर अधिक नियंत्रण देते. म्हणजे तुम्ही तुमचं ऑनलाईन स्टेटस तसंत टायपिंग स्टेटसही लपवू शकता. म्हणजे तुम्हाला हवं असल्यास समोरच्याला कळणार नाही तुम्ही नेमकं ऑनलाईन आहात की नाही. तसंच वापरकर्त्यांना GB WhatsApp वर मेसेज शेड्यूल करण्याचं फीचरही मिळतं. यूजर्स या जीबी व्हॉट्सॲपवर डिलीट केलेले मेसेज वाचू शकतात. स्टेटस डाउनलोड करण्याचा ऑप्शनही दिला गेला आहे.

​वाचा : Sanchar Saathi ची कमाल, महिन्याभरात शोधले २.५० लाखांहून अधिक चोरीचे फोन, तुम्हीही करु शकता वापर

​जीबी व्हॉट्सॲप सुरक्षित आहे का?

​जीबी व्हॉट्सॲप सुरक्षित आहे का?

क्लोन किंवा मॉडेम ​ॲप्स सहसा सुरक्षित नसतात. जीबी व्हॉट्सॲप देखील त्याला अपवाद नाही. क्लोन आणि मोडेड ​ॲप वापरणाऱ्यांवर बंदी घालण्यासाठी व्हॉट्सॲपचे कठोर धोरण आहे. जीबी व्हॉट्स​ॲप
संदेश एंड-टू-एंड एनक्रिप्टेड नसतात, त्यामुळे ते वापरकर्त्यांच्या वैयक्तिक सुरक्षिततेसाठी धोकादायक असतात. यासोबतच जीबी व्हॉट्सॲपवर युजर्सना जाहिरातीही पाठवल्या जातात. हे ​ॲप Google Play Store वर नाही म्हणून ते डाउनलोड करणे टाळावे.

वाचा :भारीच! उन्हात गेल्यावर या फोनचा कलर आपोआप बदलणार, १६ जीबीचा तगडा रॅम, ८७९९ रुपये किंमत

​जीबी व्हॉट्सॲप कसे डाउनलोड कराल?

​जीबी व्हॉट्सॲप कसे डाउनलोड कराल?

स्टेप १: स्मार्टफोनच्या ब्राउझरवर जा आणि GB WhatsApp apk शोधा. तुम्हाला याठिकाणी बरेच ऑप्शन्स सापडतील, त्यातील लेटेस्ट आवृत्ती तुम्ही डाऊनलोड करु शकता.

स्टेप २ : APK फाइल डाउनलोड केल्यानंतर, ही APK फाइल इन्स्टाल करा.

स्टेप ३: इंस्टॉलेशन वेळी काही सिक्योरिटी मेसेज विचारले जातील, त्यांना अप्रूव्ह करुन इंस्टॉलेशन प्रक्रिया पूर्ण करा. त्यानंतर, मोबाईल नंबरसह GB WhatsApp मध्ये साइन इन करा.

वाचा : Meta Verified: आता ६९९ रुपये देऊन इन्स्टाग्रामसह फेसबुकही होणार वेरिफायड, मेटा वेरिफायड भारतात लाँच

​जीबी व्हॉट्सॲप वापरण्यास व्हॉट्सॲप बंदी घालू शकते?

​जीबी व्हॉट्सॲप वापरण्यास व्हॉट्सॲप बंदी घालू शकते?

WhatsApp चे प्लॅटफॉर्मवरून बदललेले किंवा क्लोन केलेले ॲप्स वापरणाऱ्या वापरकर्त्यांना तात्पुरते आणि कायमचे बॅन करण्याचे धोरण आहे. जर व्हॉट्सॲपला समजले की तुम्ही जीबी व्हॉट्सअॅप वापरत आहात, तर तुम्हाला त्याच्या प्लॅटफॉर्मवरून बॅन केले जाऊ शकते.त्यामुळे हे जीबी व्हॉट्सॲप डाऊनलोड न करण्याचा सल्ला आम्ही तुम्हाला देत आहोत.

वाचा : Battery Saver : फोनची बॅटरी सारखी संपतेय? चार्जिंग वाचवण्यासाठी या ६ टिप्स करा फॉलो

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *