Headlines

पूनम पांडेला आधीच मृत्यूची चाहूल? म्हणालेली ‘लवकरच सरप्राईज…’

[ad_1]

Poonam Pandey Last Interview : प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडेच्या आकस्मित निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. वयाच्या 32 व्या वर्षी सर्विकल कॅन्सरमुळे (गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग) तिचे निधन झाले आहे. पूनम पांडेच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन याबद्दलची पोस्ट करण्यात आली आहे. तिच्या अकाऊंटवरील पोस्टमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. यानंतर पूनम पांडेच्या पीआर टीमकडूनही तिच्या निधनाचे वृत्त खरं असल्याचे सांगण्यात आलं आहे. त्यामुळे अनेकांना धक्का बसला. 

पूनम पांडेच्या निधनानंतर आता तिचे अनेक जुने व्हिडीओ व्हायरल होत आहेत. त्याबरोबरच तिची शेवटची पोस्टही चर्चेत आली आहे. त्यातच आता पूनमचा शेवटच्या मुलाखतीदरम्यानचा व्हिडीओ समोर आला आहे. यात पूनम ही तिच्या चाहत्यांना एक आश्चर्याचा धक्का देणार असल्याचे सांगताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच एका कार्यक्रमादरम्यान पूनमने प्रसारमाध्यमांशी बातचीत केली होती. 

“लवकरच एक मोठी बातमी येणार”

या व्हिडीओत पूनम म्हणाली होती की, “तुमच्या समोर लवकरच एक खूप मोठी बातमी येणार आहे. मला लोकांना आश्चर्याचा धक्का देणं आवडतं. अनेकांना वाटतं की माझ्यात सुधारणा होत आहे, तेव्हाच मला लोकांना आश्चर्याचा धक्का द्यायचा असतो. त्यामुळे लवकरच तुमच्यासमोर एक मोठी बातमी येणार आहे”, असे तिने म्हटले. यावर ती प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीला “मला तुमची प्रतिक्रिया पाहणेही आवडले”, असे म्हटले आहे. तिचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. 

पूनम पांडेचे निधन 1 फेब्रुवारी 2024 रोजी रात्री झाले, असं बोललं जात आहे. तिने उत्तर प्रदेशमधील निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. तिच्या मॅनेजरने झूमशी संवाद साधताना तिचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. तिच्या पीआर टीमनेही दुजोरा दिला असून लवकरच प्रेस रिलीज जारी करणार असल्याचे सांगितले. पूनम पांडेच्या निधनाविषयी तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून कळवण्यात आलं. या पोस्टमध्ये म्हटलं आहे की “आजची सकाळ आमच्यासाठी फार कठीण होती. तुम्हाला कळविण्यास अत्यंत दु:ख होत आहे की, आपण पूनमला गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळे गमावलं आहे. या दु:खाच्या काळात, आमच्या गोपनीयतेचा आदर करावा अशी विनंती आहे”, असे यात म्हटले आहे. 

दरम्यान पूनम पांडेचा जन्म 11 मार्च 1991 रोजी कानपूरमध्ये झाला होता. ती एक मॉडेल आणि अभिनेत्री होती. तिने 2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘नशा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ती अखेरची ‘द जर्नी ऑफ कर्मा’ या चित्रपटात दिसली होती. मॉडेल, अभिनेत्री असणारी पूनम पांडे नेहमीच वादग्रस्त राहिली. कधी आपली विधानं तर कधी बोल्ड कपड्यांमुळे ती नेहमीच वादात अडकली. पूनमने ‘खतरों के खिलाडी 13’ आणि कंगना रणौतच्या ‘लॉकअप’ या रिअॅलिटी शोमध्ये झळकली होती. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *