Headlines

 पोलिसांची प्रतिमा मलिन केल्याप्रकरणी आमदार गुट्टे यांच्याविरुद्ध गुन्हा

[ad_1]

परभणी : गंगाखेडचे पोलीस अधिकारी हफ्ते वसूल करत आहेत त्यामुळेच अवैध धंदे फोफावल्याचा आरोप सोमवारी (दि. २९) आमदार रत्नाकर गुट्टे यांनी शांतता समितीच्या बैठकीत केला होता. या वक्तव्यावरून गंगाखेड पोलीस ठाण्यात पोलिसांची प्रतिमा मलिन केल्याप्रकरणी आमदार गुट्टे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उपायोजना व सूचना मांडण्यासाठी शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस आमदार गुट्टे यांच्यासह उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, सहायक पोलीस अधिकारी श्रेणिक लोढा यांचे सह शहर व तालुक्यातील प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत आमदार गुट्टे यांनी शहर व तालुक्यात अवैध धंदे सुरू असल्याचा आरोप करत  गंगाखेडच्या पोलीस निरीक्षकांसह बीट जमादारावर थेट हफ्तेखोरीचा आरोप केला होता. गुट्टे यांच्या वक्तव्यानंतर शांतता समितीची बैठक विस्कळीत झाली. वातावरण संतप्त झाले. श्रेणिक लोढा व गुट्टे यांच्यात शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. पोलिसांवर आरोप करणाऱ्या गुट्टे यांना तुम्ही पुरावे द्या, असे लोढा म्हणाले.

प्रसारमाध्यमांसह समाज माध्यमावर हा प्रकार जाहीरपणे चव्हाटय़ावर आला. बैठकीत झालेल्या खडाजंगीनंतर वातावरण निवळले असे वाटत असतानाच पोलिसांनी गुट्टे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आमदार गुट्टे यांनी शांतता समितीच्या बैठकीत पोलीस दलातील अधिकारी, अंमलदार व पोलीस दलातील व्यक्तींना त्रास होईल व जनतेमध्ये पोलिसांची प्रतिमा मलिन होईल, या उद्देशाने भाषणात बोलून पोलीस दलाची प्रतिमा बदनामी केली आहे, असे नमूद करत गुट्टे यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, ऐन सणासुदीच्या काळात व उत्सवादरम्यान गंगाखेड शहरात लोकप्रतिनिधी विरुद्ध पोलीस अधिकारी असा संघर्ष चिघळल्याने नव्याच वादाला तोंड फुटले आहे.

ही तर पोलिसांची दडपशाही – आमदार गुट्टे

 करोनाकाळाच्या दोन वर्षांनंतर राज्यात सर्वत्र सण उत्सवाचे दिवस सुरू झाले आहेत. अशा पार्श्वभूमीवर गंगाखेड शहरासह तालुक्यात बोकाळलेले अवैध धंदे बंद केले तर गुन्हेगारी कमी होईल या हेतूनेच आपण हे वक्तव्य केले होते. संतापलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या अंगावर धावून येणे हाच मुळात गंभीर प्रकार होता. त्यानंतरही आपल्या विरोधातच गुन्हा दाखल करणे म्हणजे पोलिसांची दडपशाही असल्याची प्रतिक्रिया आमदार गुट्टे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *