Headlines

Police Recruitment: १४ हजार ९५६ जागांसाठी होणारी पोलीस भरती पुढे ढकलली, नवीन जाहिरात कधी? | maharashtra Police recruitment for 14956 seats postponed rmm 97

[ad_1]

Maharashtra Police Recruitment Latest Update: करोना विषाणूच्या संसर्गामुळे मागील तीन वर्षांपासून महाराष्ट्रात पोलीस भरती प्रक्रिया राबवण्यात आली नाही. त्यामुळे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये निराशा आहे. असं असताना अलीकडेच सरकारने नोव्हेंबरपासून पोलीस भरती प्रक्रिया सुरू करणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, या घोषणेनंतर सरकारने लगेच यू-टर्न घेतला आहे. नोव्हेंबरमध्ये होणारी पोलीस भरती पुढे ढकलण्यात आली आहे. प्रशासकीय कारणास्तव ही भरती पुढे ढकलल्याची माहिती मिळत आहे.

खरं तर, राज्य पोलीस मुख्यालयाकडून एकूण १४ हजार ९५६ जागांसाठी पोलीस भरती जाहीर करण्यात आली होती. पण प्रशासकीय कारणास्तव ही भरती पुढे ढकलण्यात आली. ही भरती प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. संबंधित भरतीबाबतचा निर्णय पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे. पोलीस भरतीबरोबर राज्य राखीव दलातील पोलीस शिपाई भरतीही पुढे ढकलण्यात आली आहे.

खरं तर, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी ३ नोव्हेंबरला अर्ज भरायला सुरुवात होणार होती. पण या भरती प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा त्यांचा पुन्हा हिरमोड झाला. आज पोलीस महासंचालक कार्यालयाकडून एक प्रसिद्धपत्रक जारी करण्यात आलं आहे. त्यामध्ये प्रशासकीय कारणास्तव पोलीस भरती प्रक्रिया स्थगित करण्यात येत असल्याचं म्हटलं आहे. तसेच पोलीस भरतीची नवी जाहिरात लवकर जाहीर करण्यात येईल, असंही प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *