Headlines

महाबळेश्वरला मुख्यमंत्रांच्या “सौ” दीड तास” वाहतूक कोंडीत अडकल्या | Chief Minister wives got stuck in traffic jam at Mahabaleshwar amy 95

[ad_1]

वाई : महाबळेश्वर गिरीस्थळी पर्यटनासाठी दिवाळी सुट्ट्यांमुळे मोठी गर्दी झाली असून वाहतुकीचे तीन तेरा वाजले आहेत.या हंगामामुळे वाहतूक कोंडी नित्याचीच झाली असून पर्यटना पेक्षा पर्यटकांचा वेळ वाहनातच जास्त जात आहे.वाहतूक कोंडीचा फटका मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांच्या सौ.लता एकनाथ शिंदे याना करावा लागला. वेण्णालेक परिसरातील वाहतूक कोंडीत तब्बल दिड तास अडकून पडल्या. पोलीस प्रशासनाच्या धावपळीनंतर दिड तासाने त्यांची या वाहतूक कोंडीतून सुटका झाली.

महाबलेश्वर गिरीस्थळी सध्या दिवाळी हंगामामुळे देशविदेशातील पर्यटक सहलीवर आल्याने पर्यटनस्थळ फुलले आहे. नौकाविहारासाठी प्रसिद्ध असलेले वेण्णालेकसह व प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी मुख्य बाजारपेठेत खरेदीसाठी पर्यटकांची चांगलीच गर्दी आहे.नेहमीप्रमाणे हंगामामध्ये होणाऱ्या गर्दी सोबतच वाहतूक कोंडीची मोठी समस्या पर्यटकांसह स्थानिकांना सतावत असून तासंतास या वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागत आहे .

मॅप्रो गार्डन, वेण्णालेक कडून महाबळेश्वर शहराकडे येणाऱ्या रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहतूक विसस्ळीत होत आहे. मखारिया गार्डन,एस टी स्टॅन्ड परिसर,बाळासाहेब ठाकरे चौक,मस्जित रस्ता,सुभाष चौक,शिवाजी चौक,मरी पेठ परिसर,आराम खिंड याबरोबरच येथील श्री क्षेत्रमहाबळेश्वर रस्ता,ऑर्थरसीट पॉईंट,केट्स पॉईंट या प्रेक्षणीय स्थळावर मोठ्या प्रमाणावर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्याचे चित्र आहे. यामुळे वाहतूक कोंडीत पर्यटकांना तासंनतास अडकून पडावे लागत आहे. पोलीस प्रशासनाचे योग्य नियोजन नसल्याने या वाहतूक कोंडीचा पर्यटकांसह स्थानिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज महाबळेश्वर तालुक्यातील दरे या त्यांच्या गावी सहकुटूंब येणार होते.मात्र मुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द झाल्याने त्यांच्या पत्नी लता शिंदे गावी जाण्यासाठी येत होत्या. त्यांना या वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसला. लिंगमळा ते वेण्णालेक या मुख्य रस्त्यावर तब्बल दिड तासांहून अधिक काळ त्यांना अडकून पडावे लागले. मुख्यमंत्री येणार असल्यान शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर व पालकमंत्री शंभूराज देसाई आले होते त्यांच्या बंदोबस्तात पोलीस गुंतल्याने येथे पुरेसा बंदोबस्त नव्हता. अखेर दिड तासांच्या प्रयत्नानंतर त्यांची सुटका झाली. मोठी वाहतूक कोंडी होणाऱ्या वेण्णा लेक परिसरात फक्त दोन कर्मचारी वाहतूक सोडवताना दिसले. अश्याच काहीशी परिस्थिती सर्वच रस्त्यांवर असून स्थानिक पोलीस अधिकारी मात्र कुठेच पाहावयास मिळाले नाहीत



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *