Headlines

Police Complaint Against Taapsee Pannu: ‘त्या’ नेकलेसमुळे तापसी पन्नूच्या अडचणी वाढणार? पोलिसांपर्यंत गेलं प्रकरण

[ad_1]

Complaint filed against Taapsee Pannu: बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूच्या (Taapsee Pannu) अडचणी वाढण्याची चिन्हं दिसत आहेत. मध्य प्रदेशमधील इंदूर (Indore) येथील एका संघटनेनं तापसीविरोधात पोलिस तक्रार केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तापसीने मुंबईमधील एका फॅशन शो दरम्यान परिधान केलेल्या नेकलेसमुळे (Taapsee Pannu Necklace) धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचं तक्रारीमध्ये नमूद करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे तापसीनेच या फॅशन शोमधील स्वत:चा फोटो आणि एक व्हिडीओ शेअर केला होता.

कोणी केली तक्रार?

‘हिंद रक्षक संघटना’ (Hind Rakshak Sangathan) नावाच्या संस्थेचे एकलव्य सिंह (Eklavya Singh Gaur) यांनी इंदूर पोलिसांकडे ‘पिंक’, ‘ब्लर’, ‘हसीन दिलरुबा’सहीत इतर अनेक हिंदी चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारणाऱ्या तापसीविरोधात लेखी तक्रार दाखल केली आहे. तापसीने फॅशन शोदरम्यान गळ्यात घातलेल्या नेकलेसमध्ये लक्ष्मी मातेची (Goddess Lakshmi) प्रतिमा होती. तिने फारच उत्तेजक कपडे परिधान केले होते, असा उल्लेख तक्रारीमध्ये असल्याची माहिती पोलिस निरिक्षक कपील शर्मा यांनी पत्रकारांना दिली. तसेच तापसीने आपल्या या कृत्यामधून अश्लीलतेचे प्रसार केल्याचंही तक्रारीत म्हटलं आहे. 

मुन्नवर फारुकीविरोधातही केलेली तक्रार

एकलव्य सिंह हे भाजपाचे स्थानिक आमदार मालिनी गौर यांचे पुत्र आहेत. यापूर्वी एकलव्य यांनीच स्टॅण्डअप कॉमेडियन मुन्नवर फारुकीविरोधात (Comedian Munawar Faruqui) तक्रार दाखल केली होती. त्यानंतर काही आठवडे मुन्नवर तुरुंगामध्ये होता. मुन्नवरनेही हिंदूच्या धार्मिक भावना दुखावल्या, हिंदू देवी-देवतांबद्दल आपल्या कार्यक्रमात वादग्रस्त विधानं केल्याचा आरोप एकलव्य यांनी केला होता. मात्र नंतर हे आरोप सिद्ध झाले नाहीत आणि मुन्नवरला जामीन मंजूर करण्यात आला. आता पुन्हा एकलव्य यांनी तापसीविरोधात धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार केली केली आहे.

तापसीने नेमकं काय पोस्ट केलं होतं?

तापसीने 14 मार्च रोजी सोशल मीडियावर एक व्हिडीओ आणि फोटो अपलोड केला होता. 12 मार्च रोजी मुंबईत पार पडलेल्या लॅकमे फॅशन विकमध्ये तापसी सहभागी झाली होती. त्याचसंदर्भातील हा व्हिडीओ आणि फोटो आहे. तापसीने परिधान केलेले दागिणे हे अक्षय तृतीया विशेष कलेक्शनमधले असल्याचं तिने सोशल मिडियावरील पोस्टमध्ये म्हटलं होतं. 

तर फोटो शेअर करताना तापसीने, “यह लाल रंग कब मुझे छोड़ेगा…” अशी कॅप्शन दिली आहे. या फोटो आणि व्हिडीओमध्ये तापसी डीपनेक रेड गाऊनमध्ये दिसत असून तिने गळ्यात एक भारदस्त नेकलेस घातलेला दिसत आहे. या नेकलेसवर लक्ष्मी मातेची प्रतिमा असून त्यामुळेच तापसीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

या प्रकरणामध्ये अद्याप एफआयआर दाखल करण्यात आलेला नाही. पोलिस प्राथमिक तपास करत आहेत.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *