Headlines

‘फिर हेरी फेरी’ चित्रपटातील ‘ही’ अभिनेत्री दिग्दर्शकाला टॉवेलमध्ये पाहून भडकली, पुढे झालं ते…

[ad_1]

Bipasha Basu: ‘हमशकल्स’ चित्रपटाचा दिग्दर्शक साजिद खानचा फ्लॉप चित्रपट ठरला होता. त्यापुर्वी त्याने केलेला हिम्मतवाला हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर फार काही आपली जादू दाखवू शकला नाही. सैफ अली खान, तमन्ना भाटिया, बिपाशा बसू, ईशा गुप्ता, रितेश देशमुख, सतीश शाह, राम कपूर आणि चंकी पांडे यांच्यासारखे मल्टिस्टारर या चित्रपटात असूनही हा चित्रपट प्रेक्षकांना रूचला नव्हता. 

चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान बिपाशा बसूला साजिद खानचा खूप राग आला. इतका राग आला की तिने चित्रपटाच्या प्रमोशनमध्येही सहभाग घेतला नाही.

एक दिवस शूटिंगनंतर साजिद खानने तिला आपल्या खोलीत बोलावले. बिपाशा साजिदच्या खोलीत पोहोचली तेव्हा तो फक्त बाथ टॉवेलमध्ये होता. त्याला असे पाहून बिपाशाला खूप राग आला आणि तिने चित्रपट सोडण्याचे ठरवले. कसेबसे त्याने तिला समजावले पण नाराज झालेल्या बिपाशाने प्रमोशनमध्ये भाग घेतला नाही. यामुळे निर्माता वासू भगनानी इतका संतापला की त्याने भविष्यात बिपाशासोबत काम न करण्याची शपथ घेतली, असे बोलले गेले.  

खुद्द सैफ अली खानलाही या चित्रपटात काम केल्यामुळे पाश्चात्ताप झाला होता. त्याने हे उघडपणे कबूलही केले होते. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सैफ अली खान साजिद खानवर चांगलाच चिडला होता. चित्रपटाची खूप खिल्ली उडवली गेली. रिलीजनंतर सैफने हा चित्रपट साईन करून आपल्या आयुष्यातील मोठी चूक केल्याचे उघडपणे सांगितले.

तो म्हणाला होता की साजिद जेव्हा चित्रपट दिग्दर्शित करतो तेव्हा त्याच्याकडे स्क्रिप्ट नसते. सर्व काही त्यांच्या मनात असते. सोशल मीडियावरही या चित्रपटावर जोरदार टीका झाली होती.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *