Headlines

निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांवर पलटवार; म्हणाले, “विधानसभेला डिपॉझिट वाचलं…”

[ad_1]

भाजपाचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्यावर घणाघाती टीका होती. रावणाची लंका एकट्या हनुमानाने जाळली. या लंकेची लंका जाळायला येथे बरीच लोक आहेत, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली होती. त्यावर आता निलेश लंकेंनी गोपीचंद पडळकर यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

निलेश लंके म्हणाले, “आपल्या मर्यादा ओलांडल्या नाही पाहिजे. तुम्ही माझ्या मतदारसंघात येऊन टीका करता. मात्र, विधानसभेला तुमचं डिपॉझिट वाचलं का हे पहावे. आपल्या मतदारसंघात आपल्याला पाय ठेवायला जागा आहे का ते पाहायचे. आपल्याला किती मतं पडतात ते पाहायचं. माझ्या मतदारसंघात चालले माझी लंका जाळायला. विधानसभा निवडणुकीत ६२ हजार मतांनी मी प्रस्थापितांच्या विरोधात निवडूण आलो,” असे सडेतोड प्रत्युत्तर निलेश लंकेंनी गोपीचंद पडळकरांनी दिलं आहे.

काय म्हणाले होते गोपीचंद पडळकर?

अहमदनगरमधील पारनेर तालुक्यात असलेल्या ढवळपुरी येथे गोपीचंद पडळकर हे एका कार्यक्रमानिमित्त आले होते. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, आमदार रोहित पवार आणि निलेश लंके यांच्यावर टीका केली होती. “रावणाची लंका एकट्या हनुमानाने जाळली होती. या लंकेची लंका जाळायला येथे बरीच लोक आहेत. पवारांना बरं वाटावे म्हणून माझ्यावर बोलतो. मी अशा लोकांना किंमत देत नाही. मी पवार सोडून खाली अजिबात येत नाही. प्रत्येक अपमानाची गोष्ट डोक्यात ठेवायची असते,” असे गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं होते.

गोपीचंद पडळकर यांना किती मते पडली होती?

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीवेळी वंचित बहुजन आघाडीतून गोपीचंद पडळकर यांनी भाजपात प्रवेश केला होता. त्यानंतर भाजपाने गोपीचंद पडळकर यांना बारामती मतदारसंघातून अजित पवार यांच्या विरोधात तिकीट दिले होते. पण, पडळकर अजित पवारांनी टक्कर देऊ शकले नाही. त्या निवडणुकीत अजित पवार यांना १ लाख ९५ हजार ६४१ मते पडली होती. तर, पडळकर ३० हजार 282 मतांपर्यंतच मजल मारु शकले. त्याचं डिपॉझिटही जप्त झालं होते. अजित पवार आमि पडळकर यांच्या मतामधील अंतर तब्बल १ लाख ६५ हजार ३६५ येवढे होते.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *