Headlines

‘…पण Vicky नं सगळा खेळ बिघडवला’, कतरिना-विकीमध्ये त्याच्यामुळे पडणार मिठाचा खडा?

[ad_1]

Siddhant Chaturvedi Tried to Impress Katrina: बॉलिवूडची सुपर हॉट अभिनेत्री कतरिना कैफ जगभरातील करोडो लोकांची क्रश आहे. कतरिनाच्या चार्ममुळे आजही अनेक तिचे चाहते बेहोश होतात. बॉलीवूड  सुपरस्टार विकी कौशलशी लग्न केल्यानंतर कतरिनानं लग्न केलं तेव्हा त्या दोघांच्या चाहत्यांना फारच आनंद झाला होता. लग्नानंतर आता कतरिना पुन्हा एकदा बॉलीवूडमध्ये कमबॅक करते आहे. (Siddhant Chaturvedi Tried to Impress Katrina says in an interview but katrina didnt reply)

आपल्या या आगामी फोनभुत चित्रपटाच्या निमित्तानं कतरिना प्रमोशनमध्ये व्यस्त झालेली पाहायला मिळते आहे. बॉलीवूडमध्ये आणि बॉलीवूडबाहेर कतरिनाचे अनेक चाहते आहेत. त्यातलाच एक तिचा चाहता तिच्या या आगामी चित्रपटातही आहे जो तिच्यासोबत काम करणार आहे. तो दुसरा कोणी नसून कतरिनाचा सहकलाकार सिद्धांत चतुर्वेदी आहे. कतरिनाला एप्रेस करण्यासाठी सिद्धान्तनं यावेळी असाही काहीसा फंडा अवलंबवला आहे. 

सिद्धांत चतुर्वेदी सध्या त्याच्या आगामी ‘फोन भूत’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात सिद्धांत कतरिना कैफ आणि ईशान खट्टरसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे, चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान सिद्धांत चतुर्वेदीनं कतरिनासोबतचा आपला फॅन मोमेंट शेअर केला आहे. सिद्धांत म्हणाला की, गली बॉय सक्सेस पार्टीच्या वेळी मी कतरिनाला इम्प्रेंस करण्याचा खूप प्रयत्न केला परंतु कतरिनानं मात्र मला काही भाव दिला नाही त्यात विकीला आणि सगळा खेळ बिघडवून   सिद्धांतने कतरिनाला प्रभावित करण्याचा खूप प्रयत्न केला होता परंतु अभिनेत्रीने घास टाकला नाही. नंतर विकी कौशलने संपूर्ण खेळ उधळला.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सिद्धांत चतुर्वेदी म्हणाला की, ‘गली बॉय’ची दिग्दर्शिका झोया अख्तरच्या घरी पार्टी आम्ही गेलो होतो. तिथे मी कतरिना कैफला दुसऱ्यांदा भेटलो होतो. मला कतरिना कैफला पार्टीत माझ्या डान्स मूव्ह्सने इम्प्रेंस करायचे होतं पण तिनं मला अजिबात भाव दिला नाही. कतरिनाने माझ्याकडे लक्षही दिले नाही. ती विकी कौशलशी बोलण्यात मग्न होती, तिनं माझ्याकडे पाहिलंही नाही. 

एवढेच नाही तर सिद्धांतने कतरिनासोबत चित्रपटाच्या शूटिंगशी संबंधित किस्सेही शेअर केले. त्याने सांगितले की, फोन भूतच्या शूटिंगच्या पहिल्या दिवशी मी खूप घाबरलो होतो, कॅटरिनासोबतचा सीन शूट होणार आहे या विचाराने मला रात्री झोप लागली नव्हती. सिद्धांत चतुर्वेदी पुढे म्हणतो, ‘मला सेटवर घाम फुटला होता, तरीही मी नेहमीच कतरिनाला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत होतो.’ फोन भूत हा चित्रपट 4 नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *