Headlines

Dhanteras 2022 : ‘या’ पाच ठिकाणी दिवे प्रज्वलित घरात नांदेल सुख-समृद्धी

[ad_1]

Light Diyas On Dhantrayodashi 2022 :  दिवाळी (Diwali 2022 ) म्हणजे प्रकाशाचा सण…दिव्यांची आरास, कंदीलचा प्रकाश…या दिवाळीचा सणाची आज खऱ्याने सुरुवात होते. आज धनत्रयोदशी म्हणजेच धन तेरस. आज विष्णूचा अवतार भगवान धन्वंतरी यांचा जन्मदिवस. यंदा धनत्रयोदशीच्या दिवशी तीन विशेष योग आला आहे. सर्वार्थ सिद्धी आणि अमृत सिद्धी योग देखील त्याचं महत्व वाढवेल. या दिवशी धनत्रयोदशी प्रदोषव्रत आणि हनुमान जयंतीचाही योगायोग होत आहे. हा योगायोग तब्बल 27 वर्षांनंतर घडत आहे.

आजचा दिवस खरेदीसाठी शुभ मानला जातो. तसंच सोने खरेदीसाठी चांगला दिवस चांगला असतो. आजच्या दिवशी भांडे खरेदी करण्याचीही परंपरा आहे. त्यामुळे अनेक आज मालमत्ता, दागिने, भांडी, जमीन आणि वाहने खरेदी करतात. अनेकांना प्रश्न आहे धनत्रयोदशी कधी साजरा करायची तर 22 आक्टोबर म्हणजे आज धनत्रयोदशी साजरा करावी. कारण 23 ऑक्टोबरला प्रदोष काल सुरू होताच त्रयोदशी तिथी समाप्त होईल. शिवाय आजच्या दिवशी या पाच ठिकाणी दिवा लावल्यास आपल्याला घरात सुख-समृद्धी नांदेल. (Dhanteras 2022 and Dhantrayodashi 2022 light diyas and upay nmp)

‘या’ ठिकाणी लावा दिवा!

घराच्या दारात

तुळशीच्या झाडाखाली

घराच्या अंगणात

पूजास्थानी

पिंपळाच्या झाडाखाली

हे उपाय करा! घरात सकारात्मक उर्जा आणा

या शिवाय घरातून द्रारिद्य दूर करण्यासाठी ज्योतिषशास्त्रात आजच्या दिवशी 13 दिवे घराच्या आत आणि 13 दिवे घराच्या बाहेर ठेवावे. असं केल्यास दारिद्र्य, काळोख आणि घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. 

जर आपल्याकडे धन टिकत नसेल तर धनत्रयोदशी ते लक्ष्मी पूजनापर्यंत पूजा दरम्यान देवी लक्ष्मीला एक जोडी लवंगा चढवाव्या.
 
या दिवशी साखर, बत्ताशे, खीर, तांदूळ, पांढरे कपडे किंवा पांढर्‍या वस्तूंचे दान केल्याने धनाची कमी होत नाही. 

या दिवशी किन्नरला दान करावे आणि त्याच्यांकडून एक शिक्का मागून घ्यावा. किन्नरने स्वखुशीने शिक्का दिल्यास तर अजूनच फलदायी ठरेल. हा शिक्का आपल्या पर्स किंवा तिजोरीत ठेवल्याने कधीच पैशाची कमी जाणवत नाही.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *