Headlines

पालघर साधू हत्याकांड प्रकरण : महाराष्ट्रा सरकार तपास सीबीआयकडे सोपवण्यास तयार | palghar mob lynching case transferred to cbi maharashtra government given affidavit

[ad_1]

पालघर साधू हत्याकांड प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या हत्याकांडाचा तपास आता सीबीआयकडे वर्ग करण्यास महाराष्ट्र सरकारने तयारी दर्शवली आहे. महाराष्ट्र सरकारने तपास हस्तांतरणाला आपली हरकत नसल्याचे सांगितले असून तसे शपथपत्रही सर्वोच्च न्यायालयात सादर केले आहे.

पालघर साधू हत्याकांड प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवण्याची तयारी असल्याचे महाराष्ट्र सरकारने म्हटले आहे. तसे शपथपत्र सरकारने न्यायालयात सादर केले आहे. या प्रकरणात याआधी साधारण २०० लोकांना अटक करण्यात आली होती. पुढे नोव्हेंबर २०२२ मध्ये अटक करण्यात आलेल्या ५८ जणांना जामीन मंजूर करण्यात आला होता. तर डिसेंबर २०२० मध्ये यातील ४७ आरोपींना ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाने प्रत्येकी १५ हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला होता. याआधी आरोपींविरोधात ठोस पुरावे गोळा करण्यासाठी सीआयडीने ८०८ संशयितांची चौकशी करण्यात केली होती. तसेच १०८ साक्षीदारांचा जबाब नोंदवला होता.

नेमकं प्रकरण काय आहे?

१६ एप्रिलच्या 2022 रात्री सुरतकडे निघालेल्या दोन साधू व त्यांच्या चालकांची गडचिंचले येथे जमावाकडून अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी २०० जणांना अटक केली होती. यातील ११ आरोपी अल्पवयीन होते. तसेच या हत्याप्रकरणात पाच पोलिसांचे निलंबन तर ३० हून पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *