Headlines

Oscars 2023 : आई, मी ऑस्कर जिंकलो; पुरस्कार सोहळ्यातील अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

[ad_1]

Oscar 2023 Ke Huy Quan On Wining : यंदाच ऑस्कर हे आपल्यासाठी खरंच खूप खास राहिलयं. यंदाच्यावेळी तीन नॉमिनेश असताना आपल्याला दोन कॅटेगरीमध्ये पुरस्कार मिळाले आहेत. ‘द एलिफेंट विस्पर्स’ (The Elephant Wispers) या माहितीपटाला बेस्ट डॉक्युमेंट्री शॉर्ट फिल्ममध्ये पुरस्कार मिळाला आहे. तर आरआरआर चित्रपटाच्या ‘नाटू नाटू’ (Natu Natu) गाण्याला ओरिजनल सॉंगचा ऑस्कर पुरस्कार मिळाला. दरम्यान, यावेळी (Everything Everywhere All at Once) या चित्रपटातील सह-कलाकाराची भूमिका साकारणारा अभिनेता के ह्यू क्वानला (Ke Huy Quan) बेस्ट सपोर्टिंग रोलसाठी ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. 

के ह्यू क्वान विषयी बोलायचे झाले तर तो एक चाइल्ड आर्टिस्ट होता. त्यानंतर त्यानं 2 दशकासाठी ब्रेक घेतला. जेव्हा त्यांनं पुन्हा एकदा अभिनय करण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्याला बेस्ट सपोर्टिंग कलाकाराचा पुरस्कार मिळाला. त्यानं या चित्रपटात ऑफबीट अडव्हेंचर करणाऱ्या कलाकाराची भूमिका साकारली होती. 

के ह्यू क्वान जेव्हा पुरस्कार घेण्यासाठी स्टेजवर आला तेव्हा तो आधी स्तब्ध झाला आणि अवॉर्ड घेतल्यानंतर तो म्हणाला, माझी आई ही 84 वर्षांची आहे आणि ती घरी बसून मला आता स्टेजवर पाहत आहे. आई, मी ऑस्कर पुरस्कार जिंकलो! माझा प्रवास हा एका बोटीवर सुरु झाला होता. मी एक वर्ष निर्वासीतांच्या कॅम्पमध्ये काढला आणि मी अचानक हॉलिवूडच्या इतक्या मोठ्या स्टेजवर येऊन थांबलो. ते म्हणतात की अशा गोष्टी या फक्त चित्रपटांमध्येच पाहायला मिळतात. हे सगळं खरंच होतंय यावर माझा विश्वास बसत नाही आहे. हे… हे अमेरिकनचे स्वप्न आहे…’

हेही वाचा : ‘Naatu Naatu’ गाण्याने ऑस्कर पुरस्कार जिंकताच “RRR” च्या टीम ची रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद..पहा व्हिडिओ

पुढे के ह्यू क्वान म्हणाला, “स्वप्नांनवर विश्वास करायला शिका. मी माझ स्वप्न कधी पूर्ण होईल ही आशा सोडली होती. जे लोक हे पाहतात त्यांच्यासाठी तुमच्या स्वप्नांना जिवंत ठेवा. मला पुन्हा स्वागत करण्यासाठी धन्यवाद.”

के ह्यू क्वाननं का घेतला होता ब्रेक?

आशियाई लोकांना चित्रपटांमध्ये काही महत्त्वाच्या भूमिका नाहीत हे पाहिल्यानंतर के ह्यू क्वाननं चित्रपटसृष्टीतून ब्रेक घेतला होता. 2021 मध्ये त्यानं Everything Everywhere All at Once या चित्रपटासाठी होकार दिला. 

के ह्यू क्वाननं का केली चित्रपटामध्ये पुन्हा एन्ट्री

के ह्यू क्वान त्याच्या पुनरागमनाविषयी द लेट लेट शो विथ जेम्स कॉर्डनमध्ये म्हणाला, ‘मी माझ्या एजंटला फोन केला आणि म्हणालो, कृपया माझ्यासाठी काही मिळतय का बघा? किंवा काही मिळू शकतं का? काहीही असेल तरी फरक पडत नाही, मला फक्त हेल्थ इन्शुअरन्स भरण्यासाठी काम पाहिजे. त्यावेळी मला कुठेच काम मिळालं नव्हतं.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *