Headlines

‘या’ आहेत सर्वात महाग हिंदी Web Series, त्यांच्या बजेटमध्ये घ्याल बंगला अन् गाडी

[ad_1]

Most Expensive Web Series : हल्लीचं जग हे ओटीटीचं जग आहे. त्यामुळे वेबसिरिज पाहणं हा सध्याच्या तरूणाईच्या जीवनशैलीचाच (OTT Webseries) एक भाग आहे. त्यामुळे आज कुठली नवीन वेबसिरिज आली आहे हे जाणून घेणंही आजच्या तरूणपिढीसाठी आवश्यक ठरते. परंतु तुम्हाला माहितीये का की या तद्दन मसाल्यानं भरलेल्या, सुपरडूपर एक्शन्स आणि रोमान्सचा जलवा असलेल्या वेबसिरिज बनवण्यासाठी किती रूपये खर्च केले जातात? या वेबसिरिजची किंमत ऐकून तुमची झोप उडाल्याशिवाय (Budget OTT Webseries) राहणार नाही.

गेल्या पाच वर्षात वेबसिरिजचं जाळ हे वेगानं पसरतं आहे. वर्षभरात चित्रपटांपेक्षाही जास्त वेबसिरिज या ओटीटीवर रिलिज होत असतील. त्यातून वेबसिरिजला प्रेक्षकवर्गही अफाट आहे. त्यामुळे एकामागून एक वेबसिरिज आणि चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होतात. ( these are the most expensive web series you buy flat or bungalow and car entertainment news in marathi)

हल्ली ओटीटीवर नाना तऱ्हेचे विषय पाहायला मिळतात. त्यातून या ओटीटी प्लॅटफॉर्मवर सेन्सॉरशिप नसल्यानं त्यात दाखवलेल्या अनेक दृश्यांवर प्रचंड प्रमाणात वादही उपस्थित झाले आहेत. अनेकदा यामुळे खूप टोकाचे वादही झाले आहेत. तर काही वेबसिरिजवर तर बंदीही घालण्यापर्यंत गोष्टी गेल्या होत्या. कोरोनाच्या महामारीमध्ये वेबसिरिजच्या (Big Budget Webseries) दर्शकांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली होती. त्यातून अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींनीही ओटीटीवरही पदार्पण केले होते. त्यामुळे या प्लॅटफॉर्मनं अनेक कलाकारांना वेगळी ओळख करून दिली होती. पण तुम्हाला माहितीये का की आतापर्यंत आलेल्या वेबसिरिजमधील सर्वात महागडी वेबसिरिज कोणती होती? 

द फॅमिली मॅन 

मनोज बाजपयीची सर्वात गाजलेली वेबसिरिजमध्ये ‘द फॅमिली मॅन’. या सिरिजचे दोन सिझन आले आहेत आणि ही वेबसिरिज सर्वात जास्त गाजली असून या सिरिजसाठी प्रचंड पैसा खर्च करण्यात आला आहे. रिपोर्ट्सनुसार कळते की, या सिरिजसाठी 50 कोटी रूपये खर्च करण्यात आले आहेत. 

सेक्रेड गेम्स 2

जेव्हा ओटीटी प्लॅटफॉर्म जोर धरू लागला होता त्यावेळी पंकज त्रिपाठी आणि सैफ अली खान, नवाजउद्दीन सिद्दिकी यांची ‘द सेक्रेट गेम्स’ ही वेबसिरिज तुफान गाजली. या सिरिजच्या दुसऱ्या सिझनसाठी चक्क 100 कोटी रूपये खर्च करण्यात आले होते. 

हेही वाचा – Viral Video: भारत दौऱ्यावर आलेल्या Backstreet Boys च्या भर कार्यक्रमात विचित्र प्रकार; चक्क स्टेजवरच…

मिर्जापूर 2 

‘सेक्रेड गेम्स’नंतर ‘मिर्जापूर’ ही एक सर्वात लोकप्रिय ठरलेली वेबसिरिज होती. या सिरिजचेही दोन भाग प्रदर्शित झाले होते. या सिरिजच्या दुसऱ्या सिझनसाठी चक्क 60 कोटी रूपये खर्च करण्यात आले होते. 

मेड इन हेवन

झोया अख्तरची ‘मेड इन हेवन’ ही वेबसिरिज प्रचंड गाजली होती. या वेबसिरिजमधून लग्नसंस्थेवर भाष्य करण्यात आले होते. या सिरिजसाठी 100 कोटी खर्च करण्यात आले होते.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *