Headlines

घोडेस्वारी करताना Miss Universe स्पर्धेतील सौंदर्यवतीचा अपघाती मृत्यू

[ad_1]

Miss Universe 2022 Sienna Wier Death: मिस युनिव्हर्स (Miss Universe Model Death) या जगातल्या सर्वात लोकप्रिय आणि मानाच्या सौंदर्य स्पर्धेत सहभागी झालेली फायनलिस्ट मॉडेल सिएना वेर हिचं वयाच्या 23 व्या वर्षी दु:खद निधन झाले आहे. तिचा मृत्यू ऑस्ट्रेलियामध्ये झाला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, तिनं 2 एप्रिल रोजी तिचा हा अपघात झाला. ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे विंडसर पोलो ग्राऊंडवर घोडेस्वारी करत असताना तिचा अपघात झाला. या अपघातात ती जखमी झाली तेव्हा तिला ताबडतोब रूग्णालयात उपचारांसाठी पाठवण्यात आले होते. परंतु उपचारांदरम्यान प्राणज्योत मालवली. तिच्या चाहत्यांना मात्र तिच्या निधनामुळे धक्का बसला आहे. 

News.com.au च्या रिपोर्टनुसार, घोडेस्वारी करत असताना घोड्यावरून पडून सिएनाला जबर दुखापत झाली. त्यावेळी तिला वेस्टमीड (Autralian Model Death) रूग्णालयात नेण्यात आलं. तिचे उपचार सुरू करण्यात आले व तिला लाईफ सपोर्ट सिस्टिमवर ठेवण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून ती लाईफ सपोर्ट सिस्टिमवर ठेवण्यात आले होते. परंतु आज तिची प्राणज्योत मावळली. तिच्या घरच्यांनी तिच्या निधनाची बातमी दिल्याचे कळते आहे. (Miss Universe australia finalist model sienna Weir dies after horse riding accident) 

हेही वाचा – ‘या’ आहेत सर्वात महाग हिंदी Web Series, त्यांच्या बजेटमध्ये घ्याल बंगला अन् गाडी

कोण होती सिएना? 

ऑस्ट्रेलिया मिस युनिव्हर्स 2022 (Miss Universe 2022 Australia) या स्पर्धेत ती अंतिम फेरीपर्यंत पोहचली होती. तिनं सिडनी विद्यापीठातून सायकोलॉजी आणि इंग्लिश लिटरेचर या विषयात डबल डिग्री संपादन केली आहे. तिला घोडेस्वारीची लहानपणापासून आवड होती. युकेला जाऊन तिनं आपलं पुढील शिक्षण पुर्ण करण्याच्या तयारीत होती. तिनं मॉडेलिंग क्षेत्रात खूप चांगली कामगिरी केली आहे. तिचा सोशल मीडियावरही खूप मोठा चाहतावर्ग आहे. तिच्या निधनानं सोशल मीडियावरून शोक व्यक्त केला जातो आहे. लहानपणापासून घोडेस्वारीची आवड असलेल्या सिएनाचा घोडेस्वारी (Horse Riding) करतानाच मृत्यू येणं यावर अनेकांनी आश्चर्याचा धक्का बसला आहे. 

सिएना सोशल मीडियावरही खूप सक्रिय होती. तिचा चाहतावर्गही खूप मोठा आहे. त्याचसोबतच तिनं मॉडलिंग विश्वातही चांगलं नावं कमावलं आहे. त्यामुळे इतक्या लहान वयात तिच्या दुर्देवी मृत्यूनं सगळ्यांनीच हळहळ व्यक्त केली आहे. तिनं एका मुलाखतीतूनही आपल्या मॉडेलिंग क्षेत्रातील प्रवासाबद्दल भाष्य केले होते. तिच्या प्रेमळ आणि शांत स्वभावासाठी ती ओळखली जायची.

4 मे रोजी तिला लाईफ सपोर्ट सिस्टिमवरून (Life Support System) काढून टाकलं होतं. समोर आलेल्या माहितीनुसार, असं कळतं की तिच्या आईवडिलांची तिची सपोर्ट सिस्टिम काढायला परवानगी होती. सध्या तिची ही बातमी सगळीकडेच व्हायरल झाली आहे. तिचे चाहते तिला श्रद्धांजली वाहत आहे. सिएनाचा जन्म 2000 साली झाला होता.  



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *