Headlines

एकेकाळी नव्हते ऑटोसाठी पैसे तर कधी केलंय टेलरचंही काम, आज कमावतो करोडो

[ad_1]

मुंबई : बॉलीवूडचा कॉमेडियन स्टार राजपाल यादवला आज कोणत्याही विशेष ओळखीची गरज नाही. त्याने आपल्या कॉमेडीने प्रेक्षकांना खूप हसवलं. आपल्या करिअरमध्ये त्याने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्याने त्याच्या प्रत्येक चित्रपटात आपल्या व्यक्तिरेखेने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कॉमेडियन राजपाल यादवने भलेही छोट्या भूमिकांमधून आपल्या करिअरची सुरुवात केली असेल, पण आज त्याची व्यक्तिरेखा कथेचा महत्त्वाचा भाग आहे. त्याच्या आतापर्यंतच्या अभिनय कारकिर्दीत त्याने ‘भूल भुलैया’, ‘गरम मसाला’, ‘छुप चुप के’, ‘भागम भाग’, ‘ढोल’, ‘मुझसे शादी करोगी’, ‘वक्त: द रेस अगेंस्ट टाइम’, ‘मैंने प्यार क्यों किया’ सारख्या अनेक बिग बजेट चित्रपटांमध्ये काम करून प्रेक्षकांना खूप हसवलं आहे. पण फार कमी लोकांना हे माहित आहे की, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय टीव्ही शोमध्ये जेठालाल गडा यांच्या भूमिकेसाठी त्याला एकदा संपर्क साधण्यात आला होता.

राजपाल यादवने आपल्या कारकिर्दीत आज तो जिथे आहे तिथे पोहोचण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. मुंबईत आल्यावर कामाच्या शोधात तो मुंबईच्या रस्त्यांवर पायी फिरायचा, कारण त्याच्याकडे ऑटोसाठीही पैसे नव्हते. मात्र आपल्या मेहनतीच्या जोरावर या अभिनेत्याने आपली स्वप्ने तर पूर्ण केलीच पण आज तो अशा टप्प्यावर आहे की, तो इतरांसाठी प्रेरणास्थान बनला आहे. अभिनयाच्या दुनियेत येण्यापूर्वी त्यांने टेलरचंही काम केलं आहे. पण नंतर त्याचं नशीब बदललं आणि तो कॉमेडी किंग बनला. आज तो करोडोंची कमाई करतो.

कॉमेडीचा बादशाह राजपाल यादवला 1999 मध्ये पहिल्यांदा नशीब आजमावण्याची संधी मिळाली. याच वर्षी त्याचा ‘दिल क्या करे’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील त्यांची कॉमिक स्टाइल प्रेक्षकांना खूप आवडली होती. या चित्रपटानंतर त्याच्या अभिनय कारकिर्दीला एक ट्रॅक मिळाला आणि त्याने चुप चुप के, भूल भुलैया, मालामाल वीकली, ढोल, खट्टा मीठा, हेरा फेरी, फिर हेरा फेरी असे अनेक हिट चित्रपट दिले. या चित्रपटांमधील राजपालच्या जबरदस्त कॉमेडीचे लोकांना वेड लागलं आहे.  

राजपाल यादव 2007 मध्ये अक्षय कुमारच्या ‘भूल भुलैया’ या चित्रपटातही दिसला होता. या चित्रपटातील त्यांची व्यक्तिरेखा कथेभोवती विणली गेली होती. या हॉरर कॉमेडी चित्रपटात त्याने छोट्या पंडिताची भूमिका साकारली होती. हा चित्रपट केवळ ब्लॉकबस्टर ठरला नाही तर चित्रपटातील राजपालची व्यक्तिरेखाही खूप हिट ठरली. हा चित्रपट कमाईच्या बाबतीतही यशस्वी ठरला होता.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *