Headlines

Israel-Palestine Crisis : इस्राईलमध्ये अडकली बॉलिवूडमधली ‘ही’ अभिनेत्री, टिमचा संपर्क नाही

[ad_1]

Nushrat Bharucha Stuck in Israel : पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासने इस्राईलवर हल्ला केला, त्यानंतर दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरू झाले. अशा परिस्थितीत अनेक भारतीय तिथे अडकले आहेत. ज्यामध्ये बॉलिवूड अभिनेत्रीचाही समावेश आहे. तिच्या टीममधील एका सदस्याने याबाबत माहिती दिली आहे, तेव्हापासून चाहते चिंतेत आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरूचाच्या टिमने सांगितले की, दुर्दैवाने इस्राईलमध्ये अडकली आहे. हैफा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी ती तिथे गेली होती. त्यानंतर तेथे युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली. सध्या तिचा टीमशी कोणताही संपर्क झालेला नाही. 

टीममधील एका सदस्याने सांगितले की, नुसरतशी शेवटचा संपर्क शनिवारी दुपारी 12.30 च्या सुमारास. त्यावेळी ती तळघरात सुरक्षित होती. मात्र, सुरक्षेच्या कारणाने टिमला अद्याप कोणतीच माहिती मिळालेली नाही. आम्ही नुसरतला सुखरूप भारतात परत आणण्याचा प्रयत्न करत आहोत आणि ती सुखरूप परतेल अशी आशा आहे.

200 हून अधिक लोकांचा मृत्यू 

शनिवारी गाजापट्टीमध्ये आतंकवादी समूह हमास आणि इस्त्राईलवर यांच्यात युद्ध सुरू झालंय. ज्यामध्ये आतापर्यंत 200 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 1000 लोकं जखमी झालीय. इस्रायली लष्कराच्या म्हणण्यानुसार, हमासच्या दहशतवाद्यांनी गाझा पट्टीतून 5,000 हून अधिक रॉकेट डागले आणि सीमेजवळ अनेक इस्रायली सैनिकांनाही ताब्यात घेतले. यानंतर त्यांनीही प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली.

पंतप्रधानांकडून युद्ध घोषित 

पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी युद्ध घोषित केले. ते म्हणाले की, आम्ही युद्धात आहोत, ऑपरेशनमध्ये नाही. हमासने इस्राईल आणि तेथील नागरिकांवर प्राणघातक हल्ला केला आहे. घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांच्या वस्त्या साफ करण्याचे आदेश मी आधी दिले. शत्रूला इतकी किंमत मोजावी लागेल की त्यांनी कधीच विचार केला नसेल.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *