Headlines

5 वर्षांपासून नोरा फतेही सहन करतेय त्रास, फिजियोथेरेपीशिवाय सेटवर उभी राहू शकत नाही…

[ad_1]

Nora Fatehi : बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही ही बॉलिवूडची डान्सिंग क्वीन म्हणून ओळखली जाते. नोरा ही अनेक चित्रपटांमध्ये आयटम सॉन्ग किंवा डान्स नंबर करताना दिसते. वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये तिची गाणी आणि डान्स स्टेप्स हे इतके लोकप्रिय झाले की छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांनी तिच्या हूक स्टेप्स केल्या. तर तिचा ‘बाटला हाउस’ मधील ‘ओ साकी साकी’ हे गाणं खूप लोकप्रिय ठरलं होतं. अभिनेत्रीनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत याचा खुलासा केला आहे. 

ई-टाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीत नोरा फतेहीनं सांगितलं की तिनं खूप वेळा ती हूक स्टेप प्रॅक्टिस केली. नोरा म्हणाली की ही इतकी कठीण स्टेप होती की पाच वर्ष झाली तरी मी आजही फिजियोथेरपी घेते. नोरा पुढे म्हणाली की ही माझी सगळ्यात आवडती स्टेप्स पैकी एक आहे. मला वाटतं की ही स्टेप पाहिल्यानंतर लोकांचं म्हणणं होतं की वाह. ती काय डान्स करते. या डान्समुळे अनेकांना आपणही काही करु शकतो असं प्रोत्साहन मिळालं. 

तर गेल्या वर्षी मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत नोरा फतेहीनं साकी साकीच्या स्टेप्सविषयी खुलासा केला की जेव्हा ती या गाण्याची प्रॅक्टिस करत होती तेव्हा तिचे गुडघे खरचटले होते आणि त्यामुळे खूप ब्लिडिंग झाली होती. तिला पाठीच्या म्हणजे मणक्यात खूप जास्त दुखापत झाली होती. तिनं सांगितलं की जास्त गाण्यांमध्ये तिला दुखापत झाली आहे किंवा स्वत: ला दुखापत करुन घेतली आहे आणि त्यासाठी तिच्या सेटवर नेहमीच फिजियोथेरपिस्ट असतो. इतका त्रास सहन केल्यानंतरही, नोरा फतेहीनं कधीच तिच्या डान्सवर परिणाम होऊ दिला आहे. 

हेही वाचा : ‘या’ एका सीनमुळे भारतात S E X टॉइजच्या विक्रीमध्ये डारेक्ट 55% वाढ!

दरम्यान, नोराच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तिनं ‘दिलबर’, ‘कमरिया’, ‘एक तो कम जिंदगानी’, ‘माणिके’, ‘जेहदा नशा’, ‘नाह’ आणि अनेक डान्स नंबर्समध्ये खूप चांगल्या स्टेप्स दाखवल्या. नोराच्या आगामी प्रोजेक्टविषयी बोलायचे झाले तर ती लवकरच वरुण तेजच्या तेलुगू चित्रपट मटकामध्ये दिसणार आहे. त्याशिवाय तिच्याकडे रेमो डिसूजाचा ‘डान्सिंग डॅडी’ हा चित्रपट देखील तिच्याकडे आहे. नोराच्या चाहत्यांविषयी बोलायचे झाले तर तिचे लाखो चाहते आहेत. तिच्या डान्स स्टेप्स या नेहमीच सगळ्यांचे लक्ष वेधताना दिसतात. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *