Headlines

nilesh lanke replied to chandrashekhar bawankule on sharad pawar black magic statement spb 94

[ad_1]

शरद पवारांनी अडीच वर्षांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्यावर जादूटोणा केला होता, अशी खोचक टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साताऱ्यात झालेल्या पत्रकार परिषदेत केली. बावनकुळेंच्या या विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे बघायला मिळते आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनीही या विधान निषेध करत बावनकुळेंना प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपा नेत्यांची मानसिकता बिघडली असून त्यातून अशी बेताल वक्तव्य होत असल्याचे ते म्हणाले.

हेही वाचा – शिर्डी अधिवेशन अर्ध्यात सोडून अजित पवार नेमकं कुठे गेले होते? त्यांनीच स्वत: केला खुलासा, म्हणाले “माझ्याशिवाय यांचं…”

“चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवारांबाबत जे बेताल वक्तव्य केलं आहे, त्याचा मी निषेध करतो. शरद पवार हे महाराष्ट्राचे भूषण आहेत. ते महाराष्ट्राला लाभलेलं वरदान आहे. आज राज्यात जो विकास झाला आहे, त्यात सिंहाचा वाटा हा शरद पवारांचा आहे. ज्यावेळी महाराष्ट्रावर पूर किंवा भूकंप यासारखी संकटं आली, त्यावेळी शरद पवार धावून गेले. महाराष्ट्राला संकटातून बाहेर काढण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. त्यांच्याबाबत अशी बेताल वक्तव्य करणं बावनकुळेंना शोभतं नाही”, असे प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी दिली आहे.

हेही वाचा – “देवेंद्र फडणवीसांची अडचण ही आहे की…”, उपमुख्यमंत्र्यांवर सुषमा अंधारेंचा हल्लाबोल!

“भाजपा नेत्यांची मानसिकता बिघडली आहे. त्यातूनच अशी बेताल विधानं केली जात आहेत. दोन-तीन दिवसांपूर्वी एका मंत्र्यानेही सुप्रिया सुळेंबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. आज बावनकुळेंनी शरद पवारांबाबत असं विधान केलं आहे. जेवढं बावनकुळेंचं वय नाही, तेवढा शरद पवारांचा राजकीय अनुभव आहे. या लोकांची मानसिकता ढासळली आहे”, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – “मी किरीट सोमय्यांची शिष्य व्हायला तयार, पण…”, सुषमा अंधारेंचा खोचक टोला!

नेमकं काय म्हणाले होते बानकुळे?

दरम्यान, आज साताऱ्यात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर खोचक शब्दात टीका केली होती. “राष्ट्रवादी काँग्रेसने आता सत्तेत येण्याचे स्वप्न बघणे सोडले पाहिजे. बेईमानीतून सत्ता बनवण्याचा प्रयत्न अडीच वर्षांपूर्वी त्यांनी केला होता. उद्धव ठाकरेंवर एकप्रकारे जादूटोणा करण्यात आला होता. त्यात उद्धव ठाकरे फसले आणि विचार न करता राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर गेले. हा जादूटोणा राष्ट्रवादी काँग्रेसने केला होता. मात्र आता आम्ही सतर्क झालो आहे. २०२४ मध्ये देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात आमचे २०० पेक्षा जास्त आमदार निवडून येतील, त्यामुळे राष्ट्रवादीने सत्तेत येण्याचा विचार आता करू नये” असे ते म्हणाले होते. तसेच जादूटोणा करणारे भोंदूबाबा कोण? अशा प्रश्न पत्रकारांनी विचारताच, “ते भोंदूबाबा कोण, हे पूर्ण देशाला आणि राज्याला माहिती आहे. शरद पवारांच्या ताब्यात एकदा कोणी आला, तर त्याची सुटका होत नाही”, अशी प्रतिक्रिया त्यांन दिली.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *