Headlines

”मी डेटॉलनं गुळण्या केल्या…” नीना गुप्ता यांनी सांगितला पहिल्या किसिंग सीनचा अनुभव

[ad_1]

Neena Gupta on Kissing Scene: अभिनेत्री नीना गुप्ता आपल्या उकृष्ट अभिनयासाठी ओळखल्या जातात. चित्रपटांपासून दुरावलेली ही अभिनेत्री पुन्हा हिंदी चित्रपटसृष्टीत आली आणि मग तिच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली. आज नीना गुप्ता यांचं प्रचंड मोठं फॅन फॉलोईंग आहे. नीना आता ओटीटीवरही खूप सक्रिय आहेत त्यामुळे त्यांची सर्वत्र चर्चा असते. परंतु सध्या पुन्हा एकदा नीना गुप्ता चर्चेत आल्या आहेत. त्यांनी आपल्या पहिल्या किसिंग सीनविषयी खुलासा केला आहे. यावेळी त्यांनी आपण जेव्हा पहिल्यांदा किसिंग सीन दिला तेव्हा आपली कशी अवस्था झाली होती, यावर भाष्य केले आहे. आपण पहिला किसिंग सीन दिला तेव्हा आपण चक्क डेटोलनं गुळण्या केल्या होत्या, असं त्यांनी यावेळी एका मुलाखतीत सांगितलं आहे.

नीना गुप्ता आपल्या बोल्ड व्यक्तिमत्त्वासाठीही प्रचंड लोकप्रिय आहे. सध्या त्यांच्या ‘लस्ट स्टोरीज 2’ या चित्रपटाच्या ट्रेलरमधील डायलॉगमुळे नीना गुप्ता चर्चेत आल्या आहेत. ‘गाडी चालविण्यापुर्वी आपण सगळे टेस्ट ड्रायव्हिंग करतोच ना, मग लग्नापुर्वी का नाही?’ असा प्रश्न नीना गुप्ता एका सीनमध्ये अगदी आत्मविश्वासानं विचारताना दिसतात. हा प्रश्न ऐकून त्याच सीनमध्ये एक माणूस नीना गुप्तांच्या या संवादाला प्रत्युत्तर देताना दिसतो आणि म्हणतो की, ‘म्हणजे तुमचा म्हणण्याचा अर्थ आहे की प्रत्येकासोबत रात्र… श्शी.’ यावर नीना गुप्ता म्हणतात, ‘काय श्शी!’ सध्या हा डायलॉग चांगलाच व्हायरल होताना दिसतो आहे. या सिरिजबद्दलही जनमानसात चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे सध्या या चित्रपटाबद्दलही लोकांमध्ये उत्सुकता आहे. पाच वर्षांनंतर या चित्रपटाचा पुढचा भाग येतो आहे. 

नक्की काय होता तो प्रसंग? 

‘इनसाईड बॉलिवूड’शी संवाद साधताना नीना गुप्ता म्हणाल्या की, ”एक कलाकार असल्यानं तुम्हाला प्रत्येक सीनसाठी तयार रहावं लागतं. कधी तुम्हाला चिखलात उतरावं लागतं तर कधी तुम्हाला कित्येक तास भर उन्हातही उभं रहावं लागतं.” मध्यंतरी नीना गुप्ता यांचा असाच एक भर उन्हात उभं राहून शुटिंग करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. 

त्या पुढे म्हणाल्या की, ”बऱ्याच वर्षांपूर्वी मी दिलीप धवन यांच्याबरोबर एक मालिका केली होती. या मालिकेत सर्वप्रथम भारतीय टेलिव्हिजनवर लिप टू लिप किसिंग सीन दाखवण्यात आला होता. तेव्हा मला या किसिंग सीनमुळे रात्रभर झोप नव्हती. याला कारण असं की एकतर मी आणि दिलीप हे फार चांगले मित्रही नव्हतो त्यातून आम्ही एकमेकांचे सहकलाकार म्हणून काम करत होतो.”

हेही वाचा – गढूळ पाणी आणि दुर्गंधीमध्ये रोमान्स! राजेश खन्ना-शर्मिला टागोर यांच्या ‘या’ लोकप्रिय गाण्याची आठवण

”शारीरिकदृष्ट्या किंवा मानसिकदृष्ट्या मी यासाठी तयार नव्हते. मला प्रचंड टेंशन आलं होतं. तरी मी स्वत:ला यासाठी तयार केलं होतं. तो सीन जेव्हा संपला तेव्हा मी अक्षरक्ष: डेटॉलनं गुळण्या केल्या. एका अनोळख्या व्यक्तीला कीस करणं ही गोष्टच माझ्यासाठी पचणारी नव्हती. त्यानंतर ही किसिंग सीनची क्लिप चॅनलनं प्रमोशनसाठी वापरली आणि मग त्यानंतर लोकांनी यावर प्रचंड टीका केली होती. त्यानंतर हा सीनही काढून टाकण्यात आला.” असं त्या यावेळी म्हणाल्या. ‘लस्ट स्टोरीज 2’ हा मोस्ट अवेडेट चित्रपट 29 जूनला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होतो आहे. या चित्रपटातून  तमन्ना भाटीया, मृणाल ठाकूर, काजोल, कुमुद मिश्रा, विजय वर्मा, अमृता सुभाष, तिलोत्तमा शोम, अंगद बेदी प्रमुख भुमिकेत आहेत. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *