Headlines

“माझे सासरे शिंदे होते, जावयाच्या ज्या काही…”; CM शिंदेंच्या बाजूला बसून पवारांचं विधान; फडणवीस भन्नाट उत्तर देत म्हणाले, “सासरच्या माणसांना…” | MCA election Sharad Pawar Says my father in law was shinde devendra fadnavis come out with epic reply scsg 91

[ad_1]

मुंबई क्रिकेट संघटनेची (एमसीए) बहुचर्चित त्रवार्षिक निवडणूक आज पार पडत आहे. अध्यक्षपदासाठी शरद पवार-आशीष शेलार गटाचे उमेदवार अमोल काळे आणि मुंबई क्रिकेट गटाचे उमेदवार माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांच्यात चुरस पाहायला मिळणार आहे. याच निवडणुकीच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आलेल्या स्नेहभोजन समारंभात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार एकाच मंचावर दिसून आले. यावेळी तिन्ही नेत्यांनी जोरदार शाब्दिक फटकेबाजी केल्याचं चित्र पहायला मिळालं. शरद पवार यांनी आपली पत्नी शिंदे कुटुंबातील असल्याचं मुख्यमंत्री शिंदे शेजारी बसलेले असतानाच सांगितलं. आपण शिंदेंचे जावई असल्याच्या पवारांच्या विधानावर फडणवीस यांनी अगदी जशात तसं उत्तर दिलं.

शरद पवार यांनी आपल्या छोटेखानी भाषणामध्ये सासर हे शिंदे होते आणि ते उत्तम क्रिकेटर होते असा संदर्भ मिश्कीलपणे दिला. माझे सासरे शिंदे होते म्हणून शिंदेंनी आपल्या जावयाची काळजी घ्यावी असा मिश्कील टोला पवारांनी मुख्यमंत्र्यांना लवगला. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही तितक्याच मिश्कीलपणे उत्तर दिलं. “माझे सासरे शिंदे होते,” असं पवारांनी हातवारे करुन म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला.

पुढे पवारांनी, “नुसते शिंदे नव्हते क्रिकेटर होते. शिंदेंची मुलगी पवारांची बायको आहे. त्यामुळे शिंदेंनी आपल्या मुलीची काळजी नीट घेण्यासाठी जावयाच्या ज्या काही सूचना असतील त्याचा गांभीर्याने विचारल कराल, अशी विनंती करतो,” असं पवार म्हणाले. या टोलेबाजीला सभागृहात उपस्थित असणाऱ्या एमसीएच्या पदाधिकाऱ्यांनी टाळ्या वाजवून दाद दिली.

पवारांच्या या गुगलीवर फडणवीस यांनी अगदी तशाच पद्धतीने शाब्दिक षटकार लगावताना सासरच्या माणसांना कोण टाळू शकतं असा सवाल विचारताच सभागृहात पुन्हा हशा पिकला. “आताच पवारसाहेबांनी मुख्यमंत्र्यांवर जी काही जबाबदारी टाकली आहे. ती जबाबदारी टाकताना मुख्यमंत्र्यांना असं बांधलेलं आहे. सासरच्या माणसांना कोण टाळू शकतं?” असं फडणवीस यांनी हसतच विचारलं.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *