Headlines

आणेवाडी टोल नाक्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन |Movement of swabhimani farmers organization at Anewadi toll booth satara district raju shetti

[ad_1]

सातारा: जिल्ह्यातील आणेवाडी टोल नाका येथे आज सकाळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन केले. पुणे येथे राजू शेट्टी यांच्या आंदोलनासाठी निघालेल्या वाहनांकडून टोल आकारणी केल्याने विरोध करण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी टोल आकारणी सवलत दिली जाते आम्हाला का दिली जात नाही, असे म्हणत आंदोलकांनी ठिय्या आंदोलन सुरू केल्याने पुणे -बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आज पुणे साखर आयुक्त कार्यालयावर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. ऊस उत्पादकांना अधिक दर मिळावा, उसातील काटेमारी थांबवण्यात यावी यासह अनेक प्रश्न घेऊन त्यांनी आंदोलन करण्याचे ठरवले आहे. याकरिता त्यांनी राज्यभरातील शेतकऱ्यांना पुणे येथे येण्याचे आवाहन केले होते.

हेही वाचा : पुण्यात कंपनी मालकाच्या नावे दोन कोटींचे कर्ज, फसवणूक प्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा

त्यानुसार कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील हजारो शेतकरी आज पुणे येथे वाहनातून निघाले होते. आणेवाडी टोल नाका येथे आल्यावर त्यांच्याकडून टोल आकारणी करण्यात आली. मात्र आंदोलनासाठी जात असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी टोल आकारणी केली नव्हती. आमच्याकडून का करता, असा सवाल त्यांनी केला. यातून टोल नाक्यावरील कर्मचारी व कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली. परिणामी टोलनाक्यावरून होणारी वाहतूक बंद पडली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *