Headlines

mns leader gajanan kale criticized shivsena over statement of uddhav thackeray spb 94

[ad_1]

शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधताना, ”भाजपाने कितीही बाण पळवले तरी धनुष्य माझ्याकडेच आहे”, असे वक्तव्य केले होते. उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यावरून मनसेने खोचक टोला लगावला आहे. मनसे प्रवक्त गजानन काळे यांनी एक गाणं ट्वीट करत शिवसेनेवर टीका केली आहे.

मनसेचे प्रवक्त गजानन काळे यांनी आठ सेकंदचा एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. या व्हिडीओ शिवसेनेला खोचक टोला लगावला आहे. ”धनुष्याला बाण नाही, बाणाला धार नाही, तलवारी चार नाही, यांचं काही खरं नाही” असे या गाण्याचे बोल आहे. यावरून पुन्हा एकदा शिवसेना मनसे संघर्ष होण्याची शक्यता आहे.

उद्धव ठाकरेंनी नेमकं काय म्हटलं होतं?

उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी शिवसेना भवनमध्ये उत्तर भारतीय महासंघाच्या प्रतिनिधींची बैठक घेतली होती. यावेळी बोलताना त्यांनी भाजपावर जोरदार टीका केली होती. ”भाजपला शिवसेना संपवायची असल्याने ते कोंबड्य़ांची झुंज लावावी, तसे शिवसेना आणि त्यातून फुटणाऱ्यांची झुंज लावत आहेत. झुंजीत एक कोंबडा मेला की दुसऱ्याला मारून टाकतील”, असे ते म्हणाले होते. तसेच भाजपाने कितीही बाण पळवले तरी धनुष्य माझ्याकडेच आहे, असा इशारा ठाकरे यांनी भाजप-शिंदे गटाला दिला होता.

हेही वाचा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना खासदार गजानन कीर्तीकरांच्या भेटीला; चर्चांना उधाण!

शिवसेना आमदारांच्या बंडानंतर मनसेकडून सातत्याने उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या टीका केली जात आहे. काही दिवसांपूर्वीच गजानन काळे यांनी शिवेसेनेचा उल्लेख शिल्लकसेना असा केला होता. आदित्य ठाकरे यांच्या निष्ठा यात्रेवरून त्यांनी ही टीका केली होती.

”छोटे नवाब यांच्या ‘निष्ठा यात्रेचे’तर उलटे परिणाम दिसू लागले आहेत. आमदार, नगरसेवक यांनी साथ सोडल्यानंतर पक्षाचे प्रवक्ते, जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकारी पण यांना पक्ष सोडू लागले. आता यांना लवकरच ‘शिल्लक यात्रा’काढावी लागणार असं दिसतंय”, असे ट्वीट काळे यांनी केले होते.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *