Headlines

Mns leader Amey khopkar tweet on Raj Thackeray after murji patel withdraws from andheri east bypoll Andheri East Bypoll: ‘राज ठाकरेंनी अंधेरीची निवडणूक एकहाती जिंकली’ असं अमेय खोपकरांनी का म्हटलं? जाणुन घ्या…

[ad_1]

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून भाजपाने मुरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याची घोषणा केली आहे. भाजपाच्या या माघारीनंतर मनसे नेते अमेय खोपकर यांनी ट्वीट करत ‘राजसाहेब ठाकरेंनी अंधेरीची निवडणूक एकहाती जिंकली’ असं म्हटलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून अंधेरी विधानसभा पोटनिवडणूक लढवू नका, असं आवाहन केलं होतं. या पत्रानंतर आज भाजपाकडून निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Andheri Election: भाजपाची माघार अन् राज ठाकरेंची कौतुकाची थाप; फडणवीसांना पुन्हा पत्र लिहित म्हणाले “आज तुम्ही…”

दरम्यान, पत्राची दखल घेत निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर राज ठाकरे यांनी भाजपाचे आभार मानले आहेत. “काल केलेल्या विनंतीली मान देऊन आपण अंधेरी पोटनिवडणुकीत उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला. त्याबद्दल आपले, आपल्या सहकाऱ्यांचे आणि वरिष्ठ नेत्यांचे आभार. चांगली, सकारात्मक संस्कृती सुदृढ समाजासाठी आवश्यक असते. राजकीय मंचावर आपापले मुद्दे घेऊन निकोप स्पर्धा करावी असा प्रयत्न मनसे म्हणून आम्ही कायमच करत असतो. त्याला आज तुम्ही प्रतिसाद दिलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार,” असं राज ठाकरेंनी फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

भाजपाच्या या निर्णयावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे. “भाजपाच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. मुळात गेल्या एक महिन्यापासून राज्यात जी चिखलफेक सुरू होती, ती टाळता आली असती. मात्र, आता शेवट गोड होतोय याचा आनंद आहे”, असे देशपांडे यांनी म्हटले आहे.

मोठी बातमी! अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपाची माघार, ऋतुजा लटकेंचा बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा

भाजपाची विनंती राज ठाकरेंनी का फेटाळली होती?

भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांनी रविवारी राज ठाकरे यांची भेट घेत भाजपा उमेदवाराला पाठिंबा देण्याची विनंती केली होती. ही विनंती राज ठाकरे यांनी फेटाळली होती. “रमेश लटके हे चांगले कार्यकर्ते होते. अगदी शाखाप्रमुख पदापासून त्यांची वाटचाल सुरू झाली. त्यांच्या राजकीय प्रवासाचा मी एक साक्षीदार आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी आमदार झाल्यास रमेश लटके यांच्या आत्म्याला खरोखर शांती मिळेल. यामुळेच भाजपाने ही निवडणूक लढवू नये आणि त्यांच्या पत्नी निवडून येतील असे पाहावे” असे राज ठाकरे यांनी भाजपाला लिहिलेल्या पत्रात म्हटले होते.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *