Headlines

मिर्झापूरचा ‘गुड्डू भैय्या’ बाप होणार! रिचा चढ्ढा, अली फजलनं इन्स्टावरून शेअर केली Good News

[ad_1]

Richa Chadha-Ali Fazal : गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमच्या प्रेग्नंसीच्या चर्चा सुरु होत्या. त्यात तिचा पती आदित्यनं सांगितलं होतं की त्याच्या घरी लवकरच लक्ष्मी किंवा गणेश येऊ शकतात. आता अभिनेत्री ऋचा चड्ढा आणि अली फजल यांनी देखील त्यांच्या होणाऱ्या बाळाची घोषणा केली आहे. अली फजलनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी सगळ्यांसोबत शेअर केली आहे. मात्र, त्यांनी ही बातमी एका वेगळ्या पद्धतीनं चाहत्यांसोबत शेअर केली आहे. 

अली फजलनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये सुरुवातीला त्यानं 1 + 1 = 3 असं लिहिलं आहे. तर पुढच्या फोटोमध्ये त्यांनी त्या दोघांचा खिडकीतील फोटो शेअर केला आहे. या फोटोला कॅप्शन देत त्यानं म्हटलं की ‘छोट्या बाळाच्या हृदयाचे ठोके, आमच्या आयुष्यातील सगळ्यात मोठा आवाज आहे.’ त्याशिवाय ऋचा चड्ढासोबत शेअर केलेल्या फोटोत अली फजलनं प्रेग्नंट महिलेचं इमोटीकॉन वापरलं आहे.  

अली फजलची ही पोस्ट पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर कमेंट करत शुभेच्छा देण्यास सुरुवात केली आहे. अली फजलची पोस्ट पाहता, त्यावर कमेंट करत अनेक सेलिब्रिटींनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. एक नेटकरी म्हणाला, श्वेता बसु प्रसाद, श्रिया पिलगांवोकर, हिमांशी चौधरी, नताशा भारद्वाज, हर्षिता शेखर गौडसोबत अनेक सेलिब्रिटी आणि मित्रांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. लग्नाच्या दोन वर्षानंतर हे जोडपं आई-वडील होणार आहे. 

ऋचा चड्ढा आणि अली फजल हे 4 ऑक्टोबर 2022 रोजी लग्न बंधनात अडकले होते. त्यांचं लग्न त्या आधी होणार होतं मात्र, त्या काळातं लॉकडाऊन लागला आणि त्यांनी लग्नाची तारिख पुढे ढकलली. त्यांनी सगळ्यात आधी दिल्लीत प्री-वेडिंग सेरेमनी केली. त्यानंतर लखनऊमध्ये त्यांचं लग्न झालं. त्यानंतर मुंबईत त्यांची वेडिंग रिसेप्शन पार्टी ठेवण्यात आली होती. 

हेही वाचा : तितीक्षा तावडे ‘दृश्यम…’ फेम अभिनेत्याशी बांधणार लग्नगाठ; फोटो शेअर करत दिली Good News

एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘चुकीचं गणित केल्यानंतरही तुम्हाला संपूर्ण मार्क देण्यात येत आहेत.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘मिनी गुड्डू भैया’, तिसरा नेटकरी म्हणाला, ‘अशी गूड न्यूज देण्याचा आतापर्यंतचा हा सगळ्यात चांगला अंदाज आहे.’ याशिवाय अनेक नेटकऱ्यांनी या पोस्टवर हार्ट इमोटीकॉन शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *