Headlines

Minister Sanjay Rathore is in trouble in his constituency as former state minister Sanjay Deshmukh tying Shivbandhan print politics news ysh 95

[ad_1]

नितीन पखाले

यवतमाळ: दिग्रस विधानसभा मतदारसंघातील माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांनी आज गुरुवारी मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याहस्ते शिवबंधन बांधल्याने  ‘बाळासाहेबांची शिवसेना’मध्ये असलेले विद्यमान मंत्री संजय राठोड यांना आव्हान निर्माण झाले आहे. संजय देशमुख हे बंजारा समाजातील एक गट आणि कुणबीसह इतर समाजांची मोट बांधून संजय राठोड यांची दिग्रस मतदारसंघातील सद्दी संपवू शकतात अशी चर्चा सुरू झाली आहे.

हेही वाचा >>> शिवसेनेतील भाऊबंदकीचा नंदुरबारमध्ये भाजपला लाभ; नंदुरबार जिल्हा परिषदेत विजयकुमार गावित यांची सत्ता

दिग्रस विधानसभा मतदारसंघात संजय राठोड यांनी गेल्या चार टर्ममध्ये एकही विरोधक शिल्लक ठेवला नाही. मात्र संजय देशमुख यांनी २०१९ च्या निवडणुकीत राठोड यांना कडवी झुंज दिली होती. आज शिवबंधन बांधल्यानंतरही देशमुख यांनी राठोड यांना थेट आव्हान दिले. ‘संजय राठोड हे शिवसेनेमुळे निवडून येत होते’, असे देशमुख म्हणाले.  दिग्रस विधानसभा मतदारसंघ बंजाराबहुल आहे. शिवाय आदिवासी आणि मराठा, कुणबी समाजाची मतेही लक्षणीय आहे. राठोड हे बंजारा मतांचे ध्रुवीकरण करून निवडून येतात त्यामुळे भविष्यात संजय देशमुख हे इतर सर्व जातींची मोट बांधून राठोड यांना धक्का देऊ शकतात. बंजारा समाजातील महंत सुनील महाराज हेही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत गेल्याने त्याचा परिणामही राठोड यांच्या मताधिक्यावर होण्याची शक्यता, राजकीय गोटात व्यक्त होत आहे.

हेही वाचा >>> दिवाळीच्या धामधुमीत नांदेड काँग्रेसमध्ये भारत जोडो यात्रेची लगबग

सुनील महाराज यांनी आज मातोश्रीवर संजय देशमुख यांच्यासोबत उपस्थित राहून, बंजारा समाजातील एक गट देशमुख यांच्यासोबत असल्याचा संदेश आपल्या कृतीतून दिला आहे. संजय देशमुख हे १९९९ मध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख होते. मात्र त्यावेळी त्यांना पक्षाने तिकीट नाकारल्याने ते दिग्रसमधून अपक्ष म्हणून लढले आणि निवडून आले. काँग्रेसला पाठिंबा देऊन राज्यमंत्रीही झाले. १९९९ आणि २००४ मध्ये संजय देशमुख अपक्ष आमदार होते. त्यानंतर काँग्रेस, भाजप असा त्यांचा प्रवास राहिला आहे. मात्र दोन वर्षांपूर्वीच देशमुख यांची भाजपातून हकालपट्टी करण्यात आली होती, असे भाजप जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांनी बुधवारी स्पष्ट केले होते.२०१९ मधील विधानसभा निवडणुकीत संजय देशमुखांनी संजय राठोडांच्या विरोधात अपक्ष लढत देऊन ७५ हजार मतदान घेत राठोड यांचे मताधिक्य कमी केले होते. 

हेही वाचा >>> बीडमध्ये जयदत्त क्षीरसागर भाजपमध्ये जाण्यास इच्छुक पण…

आता शिवसेना फुटल्यानंतर संजय राठोड यांना आव्हान देण्यासाठी ते पुन्हा शिवसेनेत उद्धव ठाकरे यांच्यासोबत आले आहेत. या सर्व राजकीय खेळीत दिग्रस मतदारसंघात काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे. उद्धव ठाकरे महाविकास आघाडीसोबत लढले तर मात्र या मतदारसंघात पुन्हा वेगळी राजकीय समीकरणे बघायला मिळतील. 

आईचा सल्ला महत्त्वाचा ठरला

आज मातोश्रीवर शिवबंधन बांधल्यानंतर संजय देशमुख यांनी आपण परत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेनेत येण्यासाठी आपल्या आईचा सल्ला महत्त्वाचा ठरल्याचे सांगितले. राज्यात घडलेल्या राजकीय घडामोडीनंतर आईनेच मला शिवसैनिक हीच माझी पहिली ओळख असल्याची जाणीव करून दिली, असे ते म्हणाले.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *