Headlines

minister gulabrao patil comment on sanjay raut letter to his mother

[ad_1]

आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपाखाली सध्या तरुंगात असलेले माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खंदे समर्थक संजय राऊत यांनी त्यांच्या आईला एक पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी शिवसेना पक्षातील बंडखोरी, सध्याची राजकीय परिस्थिती, त्यांच्यावर झालेली अटकेची कारवाई अशा वेगवेगवळ्या मुद्द्यांवर भाष्य केले आहे. तसेच मी झुकणार नसून सध्या सुरू असलेल्या अन्यायाला तोंड देणार आहे, असे ते आपल्या आईला उद्देशून म्हणाले आहेत. त्यांच्या या भावनिक पत्रानंतर आता शिंदे गटातील नेते तथा मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत लवकरात लवकर बाहेर येवोत, अशी आपण प्रार्थना करुयात, असे गुलाबराव पाटील म्हणाले आहेत. ‘एबीपी माझा’ने याबाबतचे अधिक वृत्त दिले आहे.

हेही वाचा >>> ऋतुजा लटकेंचा राजीमाना न स्वीकारण्यासाठी दबाव टाकला जातोय? फडणवीसांनी ठेवलं नियमांवर बोट; म्हणाले “सर्वांसाठी…”

“मुलगा तुरुंगात असो, यात्रेत असो किंवा राजकारणात असो त्या मुलाने आपल्या आईला पत्र लिहिणे ही एक भावना आहे. यावर मी बोलणे उचित नाही. पण आता त्यांच्यावर काही आरोप करण्यात आलेले आहेत. याच सकृतदर्शनी आरोपांमुळे ते तुरुंगात आहेत. देवाच्या कृपेने ते लवकरात लवकर बाहेर येवोत, अशी प्रार्थना करूयात,” अशा भावना गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केल्या आहेत.

हेही वाचा >>>अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी ठाकरे गटाचा ‘प्लॅन बी’ ठरला? ऋतुजा लटके नसतील तर मग कोणाला उमेदवारी?

गुलाबराव पाटील यांनी अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीवर तसेच ऋतुजा लटके यांच्या राजीनामा प्रकरणावरही भाष्य केले आहे. “राजीनामा मंजूर करण्याचे काही नियम असतात. नियमाप्रमाणे राजीनामा मंजूर होईल. काहीही झालं की सरकारकडे बोट दाखवलं जात आहे. आता एवढेच काम शिल्लक राहिलेले आहे,” अशी टीका गुलाबराव पाटील यांनी केली.

संजय राऊत यांच्या पत्रात काय आहे?

पत्रा चाळ घोटाळा प्रकरणी सध्या न्यायालयीन कोठडीत असलेले खासदार संजय राऊत यांनी आपल्या आईला पत्र लिहिलं आहे. न्यायालयीन कोठडीत जाण्याआधी कोर्टाच्या बाहेर बाकड्यावर बसून लिहिलेल्या या पत्रात संजय राऊत यांनी राज्यातील सत्तासंघर्ष, बंडखोर शिंदे गटावर भाष्य केलं आहे. अटक झाल्यापासून प्रसारमाध्यमांसमोर न आलेल्या संजय राऊत यांनी पत्राच्या माध्यमातून पहिल्यांदाच आपली भूमिका मांडली आहे.

“आई, मी नक्कीच परत येईन. महाराष्ट्र आणि आपल्या देशाचा आत्मा असा सहजच कोणाला मारता येणार नाही. देशासाठी लढणारे हजारो सैनिक सीमेवर उभे असतात आणि हे महिनोन महिने घरी येत नाहीत. काही जण तर कधीच येत नाहीत. लढाई तर अशीच असते. मलाही अन्नायापुढे, शिवसेनेच्या म्हणजे महाराष्ट्राच्या दुश्मनांपुढे झुकता येत नाही. अन्यायाविरोधात मी लढा देत आहे. म्हणूनच मला तुझ्यापासून दूर जावे लागते. हा कणखरपणा व कठोरपणा मी तुझ्याकडून घेतला नाही का?,” असे संजय राऊत आपल्या पत्रात म्हणाले आहेत.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *