Headlines

कास पठारावर बारामाही पर्यटणासाठी प्रयत्न -रुचेश जयवंशी

[ad_1]

वाई:कास पठारावर बारामाही पर्यटणासाठी प्रयत्न सुरु आहेत. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी नाविण्यपूर्ण योजना तेथील स्थानिकांना सोबत घेवून करणार आहे.  अशी माहिती जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कास हे जसे फुलांचे पठार आहे. तसे ते थंड हवेचे ठिकाण आहे. त्या ठिकाणी फक्त फुलांच्या मोसमामध्ये पर्यटक येतात असे गृहीत धरुन नियोजन होत असे. आता बारमाही पर्यटन करण्याच्या अनुषंगाने प्रयत्नशील आहे.

कास महोत्सवासाठी तीस लाख रुपये पर्यटन विकास आणि जिल्हा नियोजनमधून खर्च करण्यात येणार आहेत.यावर्षी कास महोत्सव प्रायोगिक तत्वावर झाला.यातील उणिवा पुढच्या वेळी दूर केल्या जातील.यासाठी स्थानिक,वन्यप्रेमी आणि नागरिकांचा सहभाग वाढविला जाईल. पर्यटन विभागाकडे निधी मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवला आहे.इतर निधी जिल्हा नियोजन मधून देण्यात येईल.

साताऱ्यात  कामाचा व्याप मोठा आहे. माझ्याकडे दररोज भेटायला येणाऱ्या नागिरिकांच्या तक्रारी सोडवितो. त्यांच्या शंकेचे समाधान करत इतरही कामे करतो. जिह्यातील पीएम किसान सन्मान योजनेचे ९३ टक्के काम पूर्ण झाले आहे. ई केवायसीचे हे काम काही दिवसांत पूर्ण होईल. ज्यांना पीएम किसान सन्मान योजनेतून वगळे आहे. त्यांनी पुन्हा रजिस्ट्रेशन करुन योजनेत सहभागी होवू शकतात. त्याकरता तहसीलदार कार्यालयात पाठपुरावा करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. शेतकऱ्यांच्या ई पिक पाहणीसाठी त्यांनीच करणे गरजेचे आहे, असे सांगितले. महाबळेश्वरच्या पर्यटन सुविधेसाठी  व प्रकल्पाकरता ५० कोटी निधी मंजूर झाला. तो खर्च करण्यात येत आहे. फक्त साबणे रोड येथील काम होणे आहे.

कासवरील इलेक्ट्रीक बस हा पायलट प्रोजेक्ट होता. लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. एका बसच्या २० फेऱया होत आहेत. १२०० लोकांना कास फिरवून आणले जात आहे. कास परिसरात केवळ फुलांच्या हंगामापूरते पर्यटन न राहता कसे बारमाही पर्यटन करता येईल याचा माझा विचार आहे. अनेक उपक्रम कसे राबवता येतील त्याकरता माझा प्रयत्न आहे. स्थानिकांना सोबत घेवून मी तो शासनाच्या माध्यमातून पूर्णत्वास नेणार आहे, असे त्यांनी सांगितले. त्याकरता वनविभागाशी चर्चा सुरु आहे. जसे की प्री वेडींग फोटो शुट ही चोरी छुपे चालते तेथे काही पॉईंट विकासीत केल्यानंतर तेथे सुरक्षित असे प्री वेडिंग फोटो शुट करता येणार आहे. त्या ठिकाणी बोर्ड लावण्यात येणार आहेत.  फक्त फुलंच पहायला पर्यटक येतात. त्यांना आणखी काही ऍक्टीव्हीटी पहायला मिळाव्यात म्हणून मनोरंजनात्मक कार्यक्रम ठेवले होते. तेथे हॉटेल सोडून ही फायदा होऊ शकतो. महिला बचतगटांना उमेद अभियानाच्या माध्यमातून कसे सक्षम करता येईल याच ही कार्यवाही सुरु आहे. ग्रामपर्यटनही संकल्पना राबवण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. 

जिल्ह्यातील पर्यटनवाढीसाठी प्रयत्न करण्यात येतील.लंपी रोगाचे मोठ्या प्रमाणात लसीकरण झाले आहे.सातारा शहर व इतर पालिका भागात सीसीटीव्ही साठी नियोजन मधून निधी देण्यासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याशी बोलणार असल्याचे जयवंशी यांनी सांगितले.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *