Headlines

अतिवृष्टीग्रस्त भागातील १४ हजार नागरिकांचे स्थलांतर

[ad_1]

मुंबई : राज्यातील अतिवृष्टीग्रस्त भागातील १४ हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. मागील दीड महिन्यात अतिवृष्टीमुळे ११० नागरिकांचा मृत्यू झाला असून, दोन हजारांहून अधिक घरांची पडझड झाल्याची माहिती मंत्रालयातील राज्य आपत्ती नियंत्रण कक्षातून देण्यात आली.

अतिवृष्टीमुळे २८ जिल्हे व २९९ गावे प्रभावित झाली आहेत. अतिवृष्टीग्रस्त भागात ८३ तात्पुरती निवारा केंद्रे तयार करण्यात आली असून त्यात १४ हजार ४८० नागरिकांना हलविण्यात आले आहे. अतिवृष्टीमुळे ११० नगरिकांनी आपला जीव गमावला आहे, तर २१८ प्राणी दगावले आहेत. ४४ घरांचे पूर्णत: तर २ हजार ०८६ घरांचे अशंत: नुकसान झाले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात सद्य:स्थितीत पूरपरिस्थिती नाही. मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात ३० जुलै २०२२ पर्यंत सकाळी ६ वा. ते सायंकाळी ०७ वा.पर्यंत अवजड वाहनांची एकेरी वाहतूक सुरू राहणार असून सायंकाळी ७ ते सकाळी ६ वा.पर्यंत सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) दोन तुकडय़ा तैनात करण्यात आल्या आहेत.

नागपूर विभागात गडचिरोली जिल्ह्याची सध्याची पूरपरिस्थिती आटोक्यात आहे. जिल्ह्यातील वैनगंगा नदी धोक्याच्या पातळीच्या वर वाहत आहे. तसेच वर्धा, प्राणहिता व इंद्रावती या नद्या इशारा पातळीच्या वर वाहत असून नदीपात्रालगतच्या गावातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात येत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची एक तुकडी तैनात करण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील पूरपरिस्थिती आटोक्यात आहे. वर्धा नदीच्या पात्रात पाण्याची पातळी वाढत आहे. तसेच चंद्रपूर, वरोरा व भद्रावती येथील नागरिकांचे स्थलांतर करण्यात येत आहे. 

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *