Headlines

‘मी सुरक्षित, माझे नागपूर सुरक्षित’ अभियान घराघरात राबविण्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांचे आवाहन – महासंवाद

[ad_1]

सेल्फ किटच्या नोंदी काटेकोर ठेवण्याचे निर्देश

लसीकरण न झालेल्यांची शोध मोहीम राबविणार

नागपूरदि. 22 : गरज नसेल तर घराबाहेर पडू नका. लक्षणे दिसत असतील तर चाचणी करा. मास्क अनिवार्य आहे, तो लावल्याशिवाय घराबाहेर पडू नका. लसीकरणाशिवाय कोरोनापासून बचाव नाही. त्यामुळे तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत ज्या गटामध्ये मोडत असाल त्या लसीकरणाचा ताबडतोब लाभ घ्या. कोरोनाची लागण झाली असेल तर विलगीकरण करा, काळजी घ्या.  प्रशासन सर्व सुविधा पुरविण्यास तयार आहे , ‘मी सुरक्षित, माझे नागपूर सुरक्षित’ या अभियानाला स्वयम शिस्तीने प्रतिसाद द्या, असे आवाहन राज्याचे ऊर्जा मंत्री तथा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज येथे केले.

नागपूरमध्ये आज पालकमंत्री डॉ. राऊत यांनी कोविड व्यवस्थापनासंदर्भात वरिष्ठ अधिकारी तसेच टास्क फोर्सच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. नागपूरमध्ये रुग्णवाढ पाच हजाराच्या घरात असून अशावेळी कोरोना बाधितांच्या संख्येवर नियंत्रण आणण्याबाबत आजच्या बैठकीत प्रामुख्याने तपशीलवार चर्चा झाली. या बैठकीला विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा, नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी आर. विमला, महापालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. विजय मगर, वाहतूक विभागाचे उपायुक्त सारंग आव्हाड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माधुरी थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी दीपक सेलोकर याशिवाय विविध विभागांचे विभाग प्रमुख तसेच प्रमुख हॉस्पिटलचे अधिष्ठाता, टास्क फोर्सचे तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित होते.

पाच हजार रुग्णवाढ हा चिंतेचा विषय असला तरी नागरिकांनी घाबरुन जाऊ नये. रुग्णवाढ असली तरी रुग्ण गंभीर होऊन दवाखान्यात दाखल होण्याचे प्रमाण कमी आहे. मृत्यूदर सुद्धा कमी आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये मेडिकल, मेयो व गरजा पडल्यास एम्समध्ये आजमितीला  सतरा हजारावर बेड्सची उपलब्धता आहे. ऑक्सिजनची क्षमता देखील कोणत्याही आणीबाणीला तोंड देण्यास पुरेशी आहे. मात्र, या आजारावर लसीकरण हाच एकमेव उपाय असून शहर व ग्रामीणमधील पहिला व दुसरा डोस  100 टक्के पूर्ण करा, अशी सूचना आज पालकमंत्र्यांनी केली.

रुग्णवाढ रोखण्यासाठी व्यापार, उद्योग, शिक्षण, प्रशिक्षण बंद ठेवण्याऐवजी समाजातील या सर्व घटकांसोबत बैठकी लावण्याचे निर्देश त्यांनी दिलेत. कोरोना रुग्णवाढ रोखण्याची लढाई प्रत्येक घरात, प्रत्येक दुकानात, प्रत्येक बाजारपेठेत, गर्दीच्या जागी लढल्या गेली पाहिजे. यामध्ये सामान्य नागरिकांनी सहभाग घेवून मास्क घातल्याशिवाय घराबाहेर न पडणे, वारंवार हात सॅनिटाईझ करणे, सामाजिक दुरी ठेवणे यासाठी प्रयत्न झाला पाहिजे. वरील सर्व घटकांसोबत याबाबत बैठकी घेवून आवाहन करण्यात येणार आहे. माध्यमातील मालक, संपादकांशी देखील चर्चा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

लसीकरणाचा वेग वाढविण्यासोबतच आतापर्यंत एकही डोस न घेतलेले नागरिक शोधून त्यांचे लसीकरण करणे, गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी दंडात्मक कारवाईची संख्या वाढविणे, आरोग्यमित्र संकल्पना वाढवून  प्रचार-प्रसार करणे, कोविड सुविधाविषयक डॅशबोर्ड पोर्टल सुरु करणे,कोविड केअर मॅनेजमेंट सिस्टम सुरु करणे, कोविड सेल्फ किट संदर्भात अन्न व औषधी प्रशासनाने नोंदी ठेवण्याचे निर्देशित केले. यावेळी त्यांनी नागपूरसाठी पुढील आठवडा महत्त्वपूर्ण असून रुग्णसंख्येत वाढ बघून जिल्ह्यातील शाळांना सुरु करण्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल. 26 जानेवारी रोजी यासंदर्भात पुढील निर्णय जाहीर होईल. तोपर्यंत शाळा बंद असेल, असे स्पष्ट केले. 26 जानेवारी नंतरच नागपूर शहरात नवीन कोणते निर्बंध लावायचे याबाबतचा निर्णय होईल, असे ते म्हणाले.

00000

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *