Headlines

राजकीय वैमनस्यातून द्राक्षे बागेचे नुकसान , दोषींवर कठोर कारवाई करण्याची उडान फाउंडेशनची मागणी

बार्शी –  राजकीय वैमनस्यातून द्राक्षे बागेचे नुकसान प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याची उडान फाउंडेशनच्या वतीने तहसिलदार बार्शी यांच्याकडे निवेदनाद्वारे  मागणी करण्यात आली .

निवेदनात म्हटले आहे की मौजे ढोराळे येथील ग.नं. १५६ मधील  ०१ हेक्टर  द्राक्ष बागेचे  अतोनात नुकसान करून संपूर्ण बाग नष्ट केलेली आहे. सदरील घटना ही राजकीय वैमनस्यातून झालेली आहे . शेतकरी ईस्माइल पटेल हे सामाजीक क्षेत्रात कार्यरत असून त्यांचा समाजात चांगला प्रभाव आहे त्यांचे पुतण्या ईलियास पटेल वैराग सार्वत्रिक नगरपंचायत निवडणूक २०२१-२२ मधील प्रभाग क्र. ९ व १२ येथून उमेदवारीसाठी चर्चेत होते.

एका विशीष्ट पक्षाचा प्रचार केला नाही याचा राग मनात धरून दि. २०/०१/२०२२ रोजी मध्यरात्री काही समाजकंटकानी राजकीय द्वेषापोटी द्राक्ष बागेचे नुकसान केलेली आहे सदरील घटना ही आदर्श आचारसंहिता भंग करणारी आहे एका सामाजिक कार्यकर्ते व शेतकऱ्याला उध्दवस्त करणारी आहे. यामुळे सदर घटना गांभीर्याने घेणे प्रशासनास बंधनकारक आहे. कारण अशा अराजक तत्वांना वेळीच प्रतिबंध करणे गरजेचे आहे कारण भविष्यात सामान्य शेतकरी व सामाजिक क्षेत्रात कार्य करणे असंभव होईल तरी में, साहेबांना विनंती आहे की वरील दोषींना त्वरीत अटक करून त्यांचे कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि सदरील नुकसान संबंधीत पक्ष किंवा उमेदवाराच्या निवडणूक खर्चातून वसूल करून घेण्यात यावा.

निवेदन देताना उडान फाउंडेशन बार्शी चे इरफान शेख, यूनुस शेख, वसीम पठान, जमिल खान,  शोयब सैयद, शकील मुलानी, आनंद काशिद, इकबाल शिकिलकर आदि उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *