Headlines

“मी आधीच सांगितले होते…”; जावई आशिया कप स्पर्धेतून बाहेर झाल्यानंतर भडकला शाहिद आफ्रिदी

[ad_1]

Asia Cup 2022 : आशिया कप स्पर्धेसाठी (Asia Cup 2022) भारतीय संघ सज्ज झाला आहे. या स्पर्धेतील भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्याकडे सगळ्यांचच लक्ष लागलं आहे. मात्र त्याआधीच पाकिस्तानच्या संघाला मोठा धक्का बसला आहे.

पाकिस्तानचा स्टार वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी (Shaheen Afridi) दुखापतीमुळे आशिया कपमधून (Asia Cup 2022) बाहेर पडला आहे. शाहीन आफ्रिदी उत्कृष्ट फॉर्ममध्ये होता.मात्र तो स्पर्धेतून बाहेर झाला आहे.

 पण आता  शाहिद आफ्रिदीने (Shahid Afridi) जावई शाहीन आफ्रिदीचे आशिया कपमधून बाहेर पडण्यावर भाष्य केले आहे. शाहीन आफ्रिदी स्पर्धेतून बाहेर झाल्याने पाकिस्तान संघाला मोठा झटका बसला आहे.

ट्विटरवर एका चाहत्याने शाहिद आफ्रिदीला निवृत्ती मागे घेण्याचे आवाहन केले. ‘लाला शाहीन जखमी आहेत, आता निवृत्ती मागे घ्या’, असे चाहत्याने म्हटले आहे. यावर शाहिद आफ्रिदीने प्रत्युत्तर दिलं आहे.
 
‘मी त्याला आधीच सांगितले होते की तू वेगवान गोलंदाज आहेस, डाईव्ह करू नकोस, दुखापत होऊ शकते. पण नंतर वाटले की तोही आफ्रिदी आहे,असे आफ्रिदीने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.  शाहिद आफ्रिदीची मुलगी अक्सा शाहीन आफ्रिदीसोबत लग्न करणार आहे.

शाहीन आफ्रिदीला दुखापत झाली आहे, त्यामुळे तो नेदरलँड आणि इंग्लंडविरुद्धच्या घरच्या मैदानावर होत असलेल्या मालिकेतून बाहेर पडला आहे. आता तो थेट T20 विश्वचषकात परतणार आहे. त्याचबरोबर भारताचा सुपरस्टार गोलंदाज, यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह देखील दुखापतीमुळे आशिया कपमध्ये खेळू शकणार नाही. 

शाहीन आफ्रिदी हा त्याच्या वेगवान बॉलिंगसाठी ओळखला जातो. तो पाकिस्तानसाठी सर्वात मोठा सामना जिंकून देणारा गोलंदाज आहे. डावाच्या सुरुवातीला विकेट घेणे ही त्याची खासियत आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया चषक सामना २८ ऑगस्टला होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असल्याचे दिसत आहे. भारताने सर्वाधिक वेळा आशिया कप जिंकला आहे. त्याचबरोबर पाकिस्तान संघाने केवळ 2 वेळा आशिया कप जिंकला आहे.

दरम्यान, भारताकडे अनेक मॅचविनर खेळाडू आहेत, जे त्यांना विजेतेपद मिळवून देऊ शकतात.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *