Headlines

वैवाहिक जबाबदारीतून मुक्त होत ‘या’ अभिनेत्रींनी निवडलं फिल्मी करिअर

[ad_1]

मुंबई : मनोरंजन विश्वात एन्ट्री करण्यासाठी कलाकार काय करत नाहीत? आपला हा छंद पूर्ण करण्यासाठी ते कोणत्याही थराला जायला तयार असतात. पण काही कलाकार असे आहेत जे आपल्या करिअरसाठी सर्वस्व पणाला लावायला तयार असतात. आज आपण अशाच अभिनेत्रींबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी चित्रपटसृष्टीत नाव कमवण्यासाठी आपलं वैवाहिक आयुष्य उद्ध्वस्त केलं.

हेही वाचा : अजय देवगण कायद्याच्या कचाट्यात, लखलखत्या कारकिर्दीचं काय होणार?

डिंपल कपाडिया – बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री डिंपल कपाडिया (dimple kapadia) यांनी अनेक चित्रपटांमध्ये अभिनय कौशल्य दाखवलं. बॉलिवूड सुपरस्टार राजेश खन्ना यांच्याशी लग्न केल्यानंतर त्या चित्रपटसृष्टीपासून दुरावल्या. त्यानंतर 1982 मध्ये राजेश खन्ना यांच्यापासून त्या विभक्त झाल्या आणि त्या बॉलिवूडमध्ये परतल्या.

हेही वाचा : अंकिता लोखंडेकडे गुडन्यूज; Photo शेअर करत काय म्हणतेय एकदा पाहाच

चित्रांगदा सिंग – या यादीत बॉलिवूड अभिनेत्री चित्रांगदा सिंगच्या (chitrangadha singh) नावाचाही समावेश आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी चित्रांगदाचं लग्न झालं होतं. तिनं बालपणीचा मित्र गोल्फर ज्योती रंधावाशी लग्न झाले होते. चित्रांगदाने लग्नानंतर कुटुंबासोबत राहावे अशी ज्योतीची इच्छा होती. पण चित्रांगदानं तिच्या करिअरला निवडलं, त्यामुळे 2014 साली दोघांचा घटस्फोट झाला आणि ती पतीपासून विभक्त झाली.

हेही वाचा : ‘दृश्यम 2’ विजय साळगावकरच्या अडचणीत होणार वाढ, तब्बु साकारणार ‘ही’ भूमिका

मल्लिका शेरावत – इमरान हाश्मीच्या ‘मर्डर’ चित्रपटात बोल्ड सीन्सने सर्वांना आश्चर्यचकित करणारी अभिनेत्री मल्लिका शेरावत (mallika sherawat) बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध नाव आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी तिने लग्न केले होते पण तिचा पती करण गिलला तिने चित्रपटात काम करावे असे वाटत नव्हते. यामुळे 1 वर्षानंतर ती पतीपासून विभक्त झाली आणि घर सोडून मुंबईत आली. (dimple kapadia mahi gill mallika sherawat chitrangadha singh aditi rao hydari actress broke their marriage with husband for filmy career) 

आणखी वाचा : सतत चित्रपट फ्लॉप होऊनही अक्षयनं ‘रामसेतू’साठी घेतलं इतकं मानधन, रक्कम ऐकून व्हाल थक्क

अदिती राव हैदरी – या यादीत बॉलिवूड अभिनेत्री अदिती राव हैदरीचे (aditi rao hydari ) नाव पाहून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटले असेल. अभिनेत्रीनं 2006 मध्ये लग्न केलं होतं, पण एका वर्षातच त्यांचा घटस्फोट झाला आणि घटस्फोटानंतर, अदितीने 2008 साली ‘दिल्ली 6’ या चित्रपटातून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.

माही गिल – या यादीत अनुराग कश्यपच्या ‘देव डी’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री माही गिलच्या (mahi gill) नावाचाही समावेश आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तिनं करिअर सुरू करण्यापूर्वी लग्न केलं होतं. त्यानंतर तिनं पतीपासून घटस्फोट घेतला आणि चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *