Headlines

‘मराठीत हिरोला चेहरा नसतो पण हिंदीत…’, अशोक सराफ स्पष्टच बोलले

[ad_1]

Ashok Saraf On Marathi Movie-Hindi Movie Actor : मराठी कलाविश्वातील लोकप्रिय व दिग्गज अभिनेते म्हणून अशोक सराफ यांना ओळखले जाते. त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीसह बॉलिवूडमध्येही अभिनयाची छाप उमटवली. त्यांनी फक्त विनोदीचं नव्हे तर गंभीर भूमिकाही साकारल्या. अशोक सराफ यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर करण्यात आला. अशोक सराफ यांनी कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी 2023 वर्षाचा मानाचा पुरस्कार देण्यात येणार आहे. त्यानंतर आता अशोक सराफ यांचा जुन्या मुलाखतीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात ते मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार विरुद्ध हिंदी चित्रपटसृष्टी याबद्दल बोलत आहेत. 

अशोक सराफ यांनी ‘चौकट राजा’, ‘अशी ही बनवाबनवी’, ‘धूमधडाका’, ‘आम्ही सातपुते’, ‘वेड’ यांसारख्या अनेक चित्रपटातून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. काही वर्षांपूर्वी अशोक सराफ यांनी सह्याद्री वाहिनीला एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत ते हिंदी विरुद्ध मराठी कलाकारांमधील फरक सांगताना दिसत आहेत. 

“मराठीत हिरोला चेहराच नाही”

यावेळी ते म्हणाले, “मराठीमध्ये हिरोला चेहराच नाही. हिरोला काम आहे. हिरोला अभिनय आहे. पण हिरोला चेहरा नाही. हिंदी सिनेसृष्टीत वेगळं आहे. हिंदीमध्ये चेहरा आहे. पहिल्यांदा चेहरा बघतात. मी कामाचं काहीही बोलत नाही. पण चेहरा हा महत्त्वाचं ठरतो. पण मराठीत कुठल्याही अभिनेत्याला चेहरा कधीच नसतो.”

“मराठी प्रेक्षकांची एक वाखण्यासारखी गोष्ट म्हणजे ते तुम्ही कसे दिसता हा कधी विचारच करत नाही. तुम्ही काय काम करता ते आम्हाला सांगा. तुम्ही तिकडे काय करता, तुम्ही आम्हाला किती खूश करु शकता, तुम्ही किती चांगलं करुन दाखवू शकता हे आम्हाला दाखवा, तर तुम्ही आमचे हिरो. हा पूर्वापार आलेला नियम आहे. असा अमुक एक चेहऱ्याचा माणूस पाहिजे, असं मराठी चित्रपटसृष्टीत कधीच होत नाही. त्यांना कामाचं नेहमीच महत्त्व वाटत  आलंय. तुम्ही काय करता हे महत्त्वाचं आहे”, असे अशोक सराफ यांनी म्हटले. 

दरम्यान अशोक सराफ यांचा हा व्हिडीओ एका इन्स्टाग्राम चॅनलने शेअर केला आहे. त्यांचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. अशोक सराफ यांचा संपूर्ण जगभरात चाहतावर्ग आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून त्यांनी छोट्या पडद्यापासून ते मोठ्या पडद्यापर्यंत आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्यांना ‘अभिनय सम्राट’ म्हणून ओळखले जाते.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *