Headlines

Mannapuram Finance, Zomato आणि Coffee Day च्या शेअर्सवर एक्सपर्टचा महत्वाचा सल्ला

[ad_1]

मुंबई : मंगळवारी जागतिक बाजारात सकारात्मक संकेत दिसून आले. त्याचा परिणाम भारतीय बाजारांवरही दिसून आला. सोमवारी झालेले नुकसान मंगळवारच्या तेजीने भरून निघाले. मंगळवारी सेंन्सेक्स 1800 अंकांनी वधारला होता. या तेजीत बँक, टेलिकॉम, कंज्यूमर ड्युरेबल्स आणि आयटी शेअर्समध्ये तेजी दिसून आली. त्यातही Mannapuram Finance, Zomato आणि Coffee Day चे शेअर्स ऍक्शनमध्ये दिसून आले.

हे शेअर्स ऍक्शनमध्ये

मन्नापूरम फायनान्सच्या शेअरमध्ये मंगळवारी 10 टक्क्यांची घसरण दिसून आली. तसेच झोमॅटोटा शेअर 52 आठवड्यांच्या खालच्या स्तरावर पोहचला आहे. त्याशिवाय कॉफी डे च्या शेअरमध्ये 10 टक्क्यांनी तेजी नोंदवण्यात आली आहे.

CapitalVia Global Research चे टेक्निकल रिसर्चर विजय धनोटिया यांनी  या तिन्ही शेअर्सवर सल्ला दिला आहे.

मन्नापूरम फायनान्स – (Mannapuram Finance )

मन्नापूरम फायनान्सचा शेअर आपल्या सपोर्ट लेवल म्हणजेच 140 च्या आसपास ब्रेक झाला आहे. या शेअरचा पुढचा सपोर्ट 80 असू शकतो. त्यामुळे या शेअरपासून तुर्तास लांब राहण्याचा सल्ला गुंतवणूकदारांना देण्यात आला आहे.

झोमॅटो ( Zomato )

टेक्निकल एक्सपर्ट विजय धनोटिया यांनी म्हटले की, झोमॅटो आपल्या सर्वात खालच्या स्तरावर ट्रेड करीत आहेत. या शेअरमध्येही सातत्याने घसरण दिसून येत आहे. त्यामुळे झोमॅटोच्या शेअरमध्येही सध्या गुंतवणूक टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

कॉफी डे एन्टरप्राइजेस ( Coffee Day )

कॉफी डे च्या शेअरवर धनोटिया यांनी गुंतवणूकीचा सल्ला दिला आहे. या शेअरमध्ये 62 च्या लेवलच्या आसपास खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या शेअरमध्ये 48 रुपयांचा स्टॉप लॉस देण्यात आला आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *