Headlines

Mangal Margi 2023: दोन दिवसांनी मार्गी होतोय मंगळ; ‘या’ चार राशीच्या व्यक्तींनी लक्ष द्या

[ad_1]

Mangal Margi 2023: वर्षाच्या सुरुवातीलाच काही ग्रहांनी त्यांचं स्थान बदलण्यास सुरुवात केली असून, ठराविक राशींवर याचे थेट परिणाम दिसून येत आहेत. आता पुढील दोन दिवसांत म्हणजेच 13 जानेवारीला ग्रहांचा सेनापती म्हणून ओळख असणारा मंगळ वृषभ राशीत मार्गस्थ होत आहे. साधारण 30 ऑक्टोबरपर्यंत मंगळ मार्गी असेल. ज्योतिषविद्येतील संदर्भांनुसार कोणताही ग्रह मार्गी होणं म्हणजे तो सरळ दिशेनं चालणं होय. (Mangal Margi 2023 impacts and remedies )

कुणा एखाद्याच्या पत्रिकेमध्ये मंगळाचं बळ नसेल तर, त्या व्यक्तीला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो. 13 जानेवारीपासून मंगळाचं स्थान बदलणार असून, त्याचे थेट परिणाम चार राशींवर होणार आहेत. ज्यामुळं या राशीच्या व्यक्तींना सावध होण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

वृश्चिक- मंगळ वृषभ राशीतून मार्गी झाल्यानंतर या वृश्चिक राशीच्या व्यक्तिंचा स्वभाव आक्रमक होणार आहे. त्यांच्या खासगी नातेसंबंधांवर याचे थेट परिणाम दिसून येणार आहेत. रागावर ताबा ठेवा. 

तुळ – मंगळाची दृष्टी असल्यामुळं नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांशी संवाद साधताना जरा जपून. एखाद्या मोठ्या प्रवासामध्ये तुम्हाला जाण्याची संधी मिळेल. पण, काळजी घ्या. 

मिथुन- मंगळ मार्गी झाल्यानं तुमच्या वैवाहिक आयुष्यात काही वादळं येऊ शकतात. जोडीदारासोबत वाद वाढू शकतो. कायम समोरच्या व्यक्तीचं ऐकून घ्या. 

वृषभ- मंगळाची चाल याच राशीतून सुरु होणार आहे. त्यामुळं तुम्ही जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. यादरम्यानच्या काळात तुमचे खर्च वाढणार आहेत. आपल्या माणसांना जपा. 

मंगळाच्या या प्रभावांपासून वाचण्यासाठी काय उपाय करावे? 

मंगळामुळं तुमच्या जीवनात उलथापालथ होत असेल, तर शंकरपुत्र कार्तिकेय यांची पूजा करा. ही पूजा नक्कीच फळेल. मंगळाचा दोष दूर करण्यासाठी मारुतीची आराधना करा. काळभैरवाची पूजाही करा, यामुळं मंगळाचे दोष दूर होतील. 

फक्त मंगळच नव्हे, तर बुध ग्रहाचा धनु राशीत उदय होणार असल्याचंही ज्योतिषविद्येत सांगण्यात आलं आहे. बुध आणि मंगळ या दोघांच्याही स्थितीचे थेट परिणाम कर्क, मेष आणि सिंह या राशींवर होणार आहेत.  

 

 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *